दैव जाणिले कुणी...श्रीदेवी यांची 'ही' इच्छा राहिली अपूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 09:03 AM2018-02-25T09:03:51+5:302018-02-25T09:03:51+5:30
गंभीर असो वा विनोदी, त्यांच्या अनेक संवेदनशील भूमिका गाजल्या. नृत्यांगना म्हणूनही त्यांनी चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवला.
मुंबई - बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री अशी ओळख असलेल्या श्रीदेवी यांच्या अकाली मृत्यूने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. वयाच्या 54 व्या वर्षी दुबईत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गंभीर असो वा विनोदी, त्यांच्या अनेक संवेदनशील भूमिका गाजल्या. नृत्यांगना म्हणूनही त्यांनी चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवला. एका विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी श्रीदेवी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशीसह दुबईत होत्या.
फेब्रुवारीमध्ये श्रीदेवी यांनी सात ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी आपले चाहते, पती आणि आपल्या कामबद्दल ट्विट केले होते. त्यासोबतच त्यांनी एक इच्छाही व्यक्त केली होती. पण त्यांच्या अकाली जाण्यामुळं ती अपूर्ण राहिली असेच म्हणावे लागेल. दोन फेब्रुवारी रोजी त्यांनी ट्विट करत पतीसोबत सिक्कमला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती.
सिक्किम सरकारनं बोनी कपूर यांना चित्रपटातील योगदानाबद्दल सन्मानित केलं होतं. त्याबद्दल श्रीदेवी यांनी सिक्कीम सरकारचे आभार मानत सिक्कीमला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. श्रीदेवी यांचे सिक्कीम हे आवडते ठिकाण आहे. दैव जाणिले कुणी...त्यांचे आज दुबईत अकाली निधन झाले आणि त्यांची सिक्कीमला जाण्याची ती इच्छा अपूर्णच राहिली.
It was a wonderful trip of @boneykapoor to Sikkim, warmly welcomed by the Governor of Sikkim, Shri Shrinivas Patil. The peace and tranqulity of Sikkim breathtaking. Would love to visit Sikkim next time with him. @SikkimGovernorpic.twitter.com/1D8E7CCwCw
— SRIDEVI BONEY KAPOOR (@SrideviBKapoor) February 2, 2018
Would like to thank Ugen T Gyatso, Tourism & Civil Aviation Minister, Govt of Sikkim for his warm hospitality on @BoneyKapoor visit to the beautiful state of Sikkim. pic.twitter.com/kZIOQ8OIAR
— SRIDEVI BONEY KAPOOR (@SrideviBKapoor) February 2, 2018
श्रीदेवी यांचा प्रवास -
श्रीदेवीचा जन्म तामिळनाडूतील शिवकाशी या ठिकाणी झाला. वडील पेशाने वकील होते. श्रीदेवी यांना एक सख्खी आणि दोन सावत्र बहिणी आहेत. ‘थुनीवावन’ हा बालकलाकार म्हणून पहिला सिनेमा होता. या सिनेमात मुरुगन ही देवाची भूमिका साकारली होती. ज्युली या हिंदी सिनेमातही श्रीदेवी यांची झलक दिसली होती. पण त्या या सिनेमात मुख्य भूमिकेत नव्हत्या. पण, 1983 मध्ये 'हिम्मतवाला' हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि श्रीदेवी स्टार झाल्या. 1996 मध्ये निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर जुदाई चित्रपटाचा अपवाद वगळता श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर सहा वर्षानंतर श्रीदेवी यांनी मिसेस मालिनी अय्यर या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली. त्यानंतर 2012 साली आलेल्या 'इंग्लिश-विंग्लिश' या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांनी भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मॉम हा श्रीदेवी यांचा शेवटचा चित्रपट ठरला.
श्रीदेवी यांचे काही गाजलेले चित्रपट....
जुली, सोलावा सावन, सदमा, हिम्मतवाला, जाग उठा इन्सान, अक्लमंद, इंकलाब, तोहफा, सरफ़रोश, बलिदान, नया कदम, नगीना, घर संसार, नया कदम,मकसद, सुल्तान, आग और शोला, भगवान, आखरी रास्ता,जांबांज, वतन के रखवाले, जवाब हम देंगे, औलाद, नज़राना,कर्मा, हिम्मत और मेहनत, मिस्टर इंडिया, निगाहें, जोशीले ,गैर क़ानूनी,चालबाज,खुदा गवाह, लम्हे, हीर राँझा, चांदनी, रूप की रानी चोरों का राजा, चंद्रमुखी, चाँद का टुकड़ा,गुमराह,लाडला, आर्मी, जुदाई, हल्ला बोल, इंग्लिश विंग्लिश.
यांनी व्यक्त केलं दुख -
श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच बॉलिवूड, राजकरण आणि सोशल मीडियात शोक व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, रजनीकांत, कमल हसन, रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा, जॉनी लिव्हर, प्रियांका चोप्रा, प्रिती झिंटा, नेहा धुपिया, झरिन खान यांच्यासह अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रियांका चोप्राने शोक व्यक्त करताना ट्विटरवर लिहिले की, माझ्याकडे शब्द नाहीत. सर्वांकडून श्रीदेवींना श्रद्धांजली. आजचा काळा दिवस.