'गतवर्षी पवारांनी हेक्टरी 25 ते 30 हजारांची मदत मागितली होती, आज भूमिका बदलली'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 12:03 PM2020-10-19T12:03:57+5:302020-10-19T12:05:43+5:30

राज्यात गेल्यावर्षीही नोव्हेंबर महिन्यात काही भागांत अतिवृष्टी झाली होती, तेव्हाही पवारसाहेबांनी विरोधी पक्ष म्हणून पाहणी दौरा केला होता. तेव्हा त्यांनी हेक्टरी 25 ते 30 हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी केली होती.

'Last year sharad Pawar had asked for Rs 25,000 to Rs 30,000 per hectare, today the role has changed', gopichand padalkar | 'गतवर्षी पवारांनी हेक्टरी 25 ते 30 हजारांची मदत मागितली होती, आज भूमिका बदलली'

'गतवर्षी पवारांनी हेक्टरी 25 ते 30 हजारांची मदत मागितली होती, आज भूमिका बदलली'

Next
ठळक मुद्देराज्यात गेल्यावर्षीही नोव्हेंबर महिन्यात काही भागांत अतिवृष्टी झाली होती, तेव्हाही पवारसाहेबांनी विरोधी पक्ष म्हणून पाहणी दौरा केला होता. तेव्हा त्यांनी हेक्टरी 25 ते 30 हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी केली होती.

मुंबई - राज्यात अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पाहणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूरात पोहचले आहेत. तर, महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर असून ते उस्मानाबादमधील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आजपासून पाहणी दौरा सुरू होत असून बारामतीमधून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्या, पार्श्वभूमीवर भाजपा नेते आमदारगोपीचंद पडळकर यांनी मंत्र्यांच्या आणि खासदार शरद पवार यांच्या दौऱ्यावरुन राज्य सरकारवर टीका केलीय.  

राज्यात गेल्यावर्षीही नोव्हेंबर महिन्यात काही भागांत अतिवृष्टी झाली होती, तेव्हाही पवारसाहेबांनी विरोधी पक्ष म्हणून पाहणी दौरा केला होता. तेव्हा त्यांनी हेक्टरी 25 ते 30 हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी केली होती. मात्र, काही दिवसांत ते सत्तेत आले, सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांना या घोषणांचा विसर पडला. विदर्भात महापूर आला, कोकणात चक्रीवादळ आलं पण तिथंही या सरकारकडून मदत मिळाली नाही. आताही महाराष्ट्र पाण्याखाली गेलाय, शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय आणि तुम्ही दौरे करताय. पवारसाहेबांना बांधावर जावं लागतंय, मग सरकार काय करतंय, असा प्रश्न भाजपा नेते आमदारगोपीचंद पडळकर यांनी विचारलाय. 

प्रत्येक वेळेस केंद्र सरकारकडे बोट दाखवलं जातं, मदत करण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली. पण राज्य सरकारने काय केले हे सांगावे, अतिवृष्टी झाली केंद्र मदत करेल, पण किती नुकसान झालंय याचा आढावा तरी राज्याने केंद्राकडे पाठवला पाहिजे. तहसिलदार पोहचत नाही, प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचत नाही, राज्य सरकारने नुकसानीचा आढावा तरी घ्यायला हवा, केंद्र सरकारने प्रत्येक वेळेस मदत केली, कोरोना काळातही मदत केली. परंतु राज्य सरकारने 1 योजना दाखवावी असं आव्हानही गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारला दिलंय.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरही टीका

मुख्यमंत्र्यांचा दौरा जाहीर झाल्यानंतर ६ महिन्यानंतर मुख्यमंत्री घराबाहेर पडले ही ब्रेकिंग न्यूज होते, असं असेल तर महाराष्ट्रसाठी दुर्दैव दुसरं काय नाही, शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडून कोणतीही अपेक्षा धरली नाही, निर्णय घेण्याची क्षमता नाही, कोणतीही अंमलबजावणी नाही, प्रत्येक अडचणीच्या काळात विरोधी पक्षनेते गावागावात पोहचले आहेत, कोरोना, चक्रीवादळ, विदर्भ पूर प्रत्येक ठिकाणी देवेंद्र फडणवीस लोकांच्या मदतीसाठी पोहचले आहेत असंही गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

शरद पवारांनीही केली अतिवृष्टीची पाहणी

अतिवृष्टीमुळे गावपातळीवरील रस्ते खराब झाले त्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे, अतिवृष्टीचा परिणाम ऊस पिकावरही झाला, आधी कधी आलं नाही असं संकट यंदा राज्यावर आलं. उस्मानाबाद, लातूर, नांदेड, पंढरपूर, इंदापूर, सोलापूर याठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचंही मोठं नुकसान झालं,हे नुकसान भरून काढण्यासाठी कर्जाशिवाय पर्याय नाही त्यामुळे लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून कर्ज काढण्यास आग्रह करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी दिली आहे.

Web Title: 'Last year sharad Pawar had asked for Rs 25,000 to Rs 30,000 per hectare, today the role has changed', gopichand padalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.