Join us

...अखेर मृत्युला हुलकावणी

By admin | Published: December 12, 2015 1:41 AM

जेमतेम एक दिवसांच्या अर्भकाला उपचाराकरिता मुंबईला हलवण्याकरिता रुग्णवाहिका उभी होती... डॉक्टर आणि परिचारिका आतमध्ये बसली होती.

जितेंद्र कालेकर/ पंढरीनाथ कुंभार,  ठाणे/भिवंडीजेमतेम एक दिवसांच्या अर्भकाला उपचाराकरिता मुंबईला हलवण्याकरिता रुग्णवाहिका उभी होती... डॉक्टर आणि परिचारिका आतमध्ये बसली होती... धीरज आणि विकास जैन हे कुठल्याही क्षणी रुग्णवाहिकेत बसणार होते... तेवढ्यात चालकाने बाळाला लावलेल्या आॅक्सीजनचा व्हॉल्व फिरवला... एक ठिणगी उडाली आणि क्षणार्धात रुग्णवाहिकेने पेट घेतला... आतमधील दोघांनी जिवाच्या आकांताने बाहेर उडी घेतली... मुलाला वाचवण्याकरिता रुग्णवाहिकेच्या काचा फोडण्याचा प्रयत्न करूनही यश आले नाही... आता त्या बाळाच्या प्रकृतीबद्दल सतत विचारणाऱ्या आईला काय उत्तर द्यायचे, असा प्रश्न दैव बलवत्तर असल्याने वाचलेल्या पाचजणांना पडला आहे.अवघ्या १५ ते २० सेकंदाचा फरक पडला अन्यथा आमचाही जीव गेला असता, रुग्णवाहिका दुर्घटनेतून सुदैवाने बचावलेले धीरज आणि विकास जैन यांनी ‘लोकमत’जवळ ही भावना व्यक्त केली तेव्हा ते किती भेदरले आहेत ते जाणवत होते. बाळाला मात्र आम्ही वाचवू शकलो नाही हे सांगताना त्या दोघांच्या डोळ््यांच्या कडा पाणावल्या.लग्नानंतर तीन वर्षांनंतर मनीष जैन या मित्राला पहिला मुलगा झाला. पण त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याचे भिवंडीतील मित्र गोपीनाथ राजन रुग्णालयातून ठाण्यात घेऊन आले होते. त्याची प्रकृती आणखी खालावल्याने व्हेंटीलेटरवर ठेवण्याकरिता मुंबईच्या कृष्णा रुग्णालयात नेण्याची तयारी झाली. रुगणालयाच्याच रुग्णवाहिकेतून डॉ. भुवनदिप घरत आणि सिस्टर रिझो सिचाको यांच्यासह धीरज आणि विकास हे जाणार होते. त्यांच्यामागून मनिष आणि त्याचा आणखी एक मित्र विक्रम जैन हे जाणार होते. घटना घडली तेंव्हा डॉक्टर आणि सिस्टर जीवाच्या आकांताने बाहेर पडले. त्यांनी आपल्या सोबत बाळाला घेऊन बाहेर उडी मारायला हवी होती, असे नातेवाईकांचे म्हणणे होते.>> मुंबईतील सांताक्रुझ येथील ‘सूर्या’ रुग्णालयातून आलेली कार्डियाक रुग्णवाहिका नादुरुस्त होती का? डीझेल टाकीला गळती होती का? किंवा आॅक्सिजन सिलेंडर नादुरुस्त होते का? या शक्यता आता पोलिसांकडून तपासल्या जात आहेत. चालक गणेश शिंदे (३२) यांनी आॅक्सिजनचा व्हॉल्व्ह सुरु केल्यानंतर ही घटना घडल्यामुळे या प्रकरणी त्याचीही कसून चौकशी करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. यानिमित्ताने रुग्णवाहिकांच्या देखभाल, दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.डॉक्टर आणि सिस्टर गाडीत बसले होते. मागच्या दरवाजाजवळ धीरज उभा होता. चालक गणेश शिंदे यांनी आॅक्सिजनचा व्हॉल्व्ह फिरवला. त्याचवेळी कसला तरी स्पार्क झाला आणि डॉक्टर आणि सिस्टर यांनी पटापट बाहेर उडया घेतल्या. अवघ्या १५ सेकंदाचा फरक झाला. आम्हीही रुग्णवाहिकेत बसणार होतो. त्याचवेळी ही घटना घडल्याने बाहेरच राहिलो. अन्यथा पाचही जण मरण पावलो असतो, धीरज सांगत होते. क्षणार्धात आगीच्या लोळांनी रुग्णवाहिकेला घेरले. बाळ आत राहिल्याचे लक्षात येताच रुग्णवाहिकेच्या काचा हातांनी, काठयांनी फोडण्याचा प्रयत्न केला. पण काचा फुटल्याच नाहीत. बघता बघता आगीने रौद्र रुप धारण केले आणि संपूर्ण रुग्णवाहिका ज्वाळांनी लपेटून टाकली. तितक्यात मोठ्ठा स्फोट झाला. बाळाला वाचवण्याकरिता धडपडताना आमच्या हाताला जखमा झाल्याचे धीरज यांनी सांगितले.च्अचानक बाहेर उडी मारल्याने जखमी झालेले ॉक्टर व परिचारिका हेही भेदरले होते. मनीष जैन म्हणाले की, आजारी बाळाला वाचविण्यासाठी दुसऱ्या रुग्णालयात नेण्याची धडपड सुरु होती. त्याचवेळी मृत्युने त्याला अन्य मार्गाने अनपेक्षितरीत्या गाठल्याने त्याला वाचवू शकलो नाही हे शल्य नेहमीच मनाला बोचत राहील. पण आता घरी गेल्यावर त्याच्या आईला काय सांगू हा सवाल सतत सतावतो आहे, हे सांगताना त्यांचा बांध फुटला.प्रसुती करणाऱ्या रूग्णालयातच लहान मुलांवर उपचार करण्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यामुळे अशा आजारी मुलास इतरत्र हलविण्याचा त्रास पालकांना होणार नाही. तसेच योग्य चिकित्साकरून वेळेवर उपचार झाले पाहिजेत.- विकास अच्छा (मित्र)प्रसुती करणाऱ्या रूग्णालयातच लहान मुलांवर उपचार करण्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यामुळे अशा आजारी मुलास इतरत्र हलविण्याचा त्रास पालकांना होणार नाही. तसेच योग्य चिकित्साकरून वेळेवर उपचार झाले पाहिजेत.- विकास अच्छा (मित्र)मुलाच्या मृत्युची आईला कल्पनाच नाहीमनीष जैन यांचा एक दिवसाच्या मुलाचा असा अपघाती मृत्यू झाल्याचे सर्व कुटुंबीयांना व नातेवाईकांना वाईट वाटत होते. मात्र मुलाच्या आईवर शस्त्रक्रिया झाल्याने तिच्यावर काल्हेरमधील गोपीनाथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गुरूवारी रात्री १२-३०वाजता ठाण्यात घडलेल्या दुर्घटनेत आपल्या मुलाचा मृत्यू झाला याची कल्पना शुक्रवारी दुपारी २-३० वाजेपर्यंत देण्यास कुटुंबीयांचे मन धजावले नाही.