Join us

Lata Mangeshkar Demise Live Updates: पंडीत हृदयनाथ मंगेशकरांनी दिला लता मंगेशकरांच्या पार्थिवाला मुखाग्नी, लता दीदी अनंतात विलीन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2022 11:03 AM

मुंबई -भारतासह जगभरातील श्रोत्यांना अमृतसंजीवनी देत आलेला स्वर्गीय सूर आज हरपला. भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज वयाच्या ...

06 Feb, 22 06:03 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन त्यांना पुष्पांजली अर्पण केली. 

06 Feb, 22 07:37 PM

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर अनंतात विलीन

06 Feb, 22 07:26 PM

लता मंगेशकर यांच्या पार्थिवाला अखेरचा निरोप

लता मंगेशकर यांच्या पार्थिवाला संध्या. ७ वाजून १६ मिनिटांनी अग्नी देण्यात आला. पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी मुखाग्नी दिला. 

06 Feb, 22 06:58 PM

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली लता मंगेशकर यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली

06 Feb, 22 06:40 PM

अभिनेता शाहरुख खाननं वाहिली श्रद्धांजली

06 Feb, 22 06:03 PM

लता दीदींना अखेरच्या निरोप देण्यासाठी शिवाजी पार्कवर लोटला जनसागर

भारतरत्न लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्कवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे, सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, शरद पवार, पियूष गोयल, राज ठाकरे, अजित पवार, छगन भुजबळ, आदित्य ठाकरे, कैलाश खेर, जावेद अख्तर यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी उपस्थित आहेत. 

06 Feb, 22 05:41 PM

शाहरुख खान, सचिन तेंडुलकरसह अनेक मान्यवर शिवाजी पार्कवर

लता दीदींना अखेरच्या निरोप देण्यासाठी अभिनेता शाहरुख खान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह अनेक मान्यवर मंडळी शिवाजी पार्कवर उपस्थित आहेत.

06 Feb, 22 05:33 PM

लता मंगेशकर यांचं पार्थिव शिवाजी पार्कवर पोहोचलं

लता मंगेशकर यांचं पार्थिव शिवाजी पार्क परिसरात पोहोचलं. अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची तुफान गर्दी; कलाक्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित

06 Feb, 22 04:54 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत पोहोचले

लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत. शिवाजी पार्कवर उपस्थित राहून पंतप्रधान मोदी लता दीदींच्या पार्थिवाचं दर्शन घेणार आहेत.

06 Feb, 22 04:43 PM

लता दीदींचं अंत्यदर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा चाहत्यांची गर्दी

06 Feb, 22 04:41 PM

लता मंगेशकर यांचं पार्थिव शिवाजी पार्कच्या दिशेने रवाना...

06 Feb, 22 04:14 PM

लता मंगेशकरांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी

06 Feb, 22 03:50 PM

लता मंगेशकरांचं पार्थिव शिवाजी पार्कच्या दिशेनं रवाना

देशाच्या तीन्ही सैन्याकडून लता मंगेशकर यांच्या पार्थिवाला सलामी देण्यात आल्यानंतर पार्थिव शिवाजी पार्कच्या दिशेनं रवाना झालं आहे.

06 Feb, 22 03:50 PM

लता दीदींच्या निधनाचा दुखवटा; उद्या राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. 

06 Feb, 22 03:38 PM

मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वाहिनी श्रद्धांजली

06 Feb, 22 03:04 PM

प्रभूकूंजबाहेर चाहत्यांची गर्दी, पोलिसांचा मोठा बंदोबस्त

06 Feb, 22 02:31 PM

लता दीदींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी 'बिग बी' पोहोचले

लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी महानायक अमिताभ बच्चन लता दीदींच्या प्रभूकूंज या निवासस्थानी पोहोचले.

06 Feb, 22 02:26 PM

लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराची शिवाजी पार्कवर तयारी

06 Feb, 22 02:21 PM

राज ठाकरे प्रभूकूंजवर पोहोचले

लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुटुंबीयांसह प्रभूकूंज या लता दीदींच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.

06 Feb, 22 01:43 PM

जावेद अख्तर, अनुपम खेर प्रभूकुंजवर पोहोचले

06 Feb, 22 01:36 PM

लता दीदींचं पार्थिव 'प्रभूकूंज'वर दाखल

लता मंगेशकर यांचं पार्थिव मुंबईतील पेडररोड येथील प्रभूकूंज येथील निवासस्थानी पोहोचलं, चाहत्यांकडून 'लता मंगेशकर अमर रहे'च्या घोषणा. 

06 Feb, 22 01:26 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रभूकुंजवर पोहोचणार

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात प्रभूकुंज या लता दीदींच्या निवासस्थानी पोहोचणार आहेत. कुटुंबीयांची भेट घेणार. 

06 Feb, 22 01:24 PM

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वाहिली आंदरांजली

06 Feb, 22 01:12 PM

लता दीदींचं पार्थिव ब्रिच कँडी रुग्णालयातून रवाना

लता दीदींचे पार्थिव प्रभूकुंजच्या दिशेने रवाना झाले आहे, पोलिसांच्या ताफ्यात हे पार्थिव निघाले असताना रुग्णालयाबाहेर उपस्थित चाहत्यानी लता मंगेशकर अमर रहे अशा घोषणा दिल्या.

06 Feb, 22 12:33 PM

लता दीदींच्या पार्थिवाचं सर्वसामान्यांनाही दर्शन घेता येणार

लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानातच अंत्यसंस्कार होणार आहेत. सर्वसामान्यांनाही लता दीदींचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. यासाठी शिवाजी पार्कच्या जिमखाना गेट येथून नागरिकांना प्रवेश देण्यात येणार. पंतप्रधान मोदींसह व्हीआयपी व्यक्ती अंत्यदर्शनाला उपस्थित राहणार असल्यानं सारे अंत्यविधी शिवाजी पार्कमध्येच होणार आहेत. 

06 Feb, 22 12:33 PM

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं दु:ख

06 Feb, 22 12:22 PM

लता दीदींना देशाचा सर्वोच्च सन्मान 'भारतरत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला तो क्षण...

06 Feb, 22 12:18 PM

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) वाहिली श्रद्धांजली

06 Feb, 22 12:16 PM

राज्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली भावना

06 Feb, 22 12:06 PM

आदित्य ठाकरे शिवाजी पार्कवर पोहोचले

लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन शिवाजी पार्क येथे घेता येणार आहे. यासाठीच्या तयारीची माहिती घेण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे शिवाजी पार्कमध्ये पोहोचले. आदित्य ठाकरेंनी संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली संपूर्ण माहिती. 

06 Feb, 22 11:50 AM

शिवाजी पार्कमध्ये अंत्यदर्शन

लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचं मुंबईतील शिवाजी पार्क येथे दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर साडेसहा वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत विद्युतदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मंगेशकर कुटुंबीयांनी दिली आहे. 

06 Feb, 22 11:41 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार

लता मंगेशकरांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार, दुपारी चार वाजता मुंबईत दाखल होण्याची शक्यता

06 Feb, 22 11:36 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी वाहिली श्रद्धांजली

लतादीदींच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी असून त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली असून दिदींच्या जाण्याने संगीतातले एक पर्व संपले असल्याच्या शोकभावना अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत. 

06 Feb, 22 11:33 AM

उद्धव ठाकरेंनी लता मंगेशकर यांना वाहिली श्रद्धांजली

लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. तसेच स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

06 Feb, 22 11:24 AM

मुंबईत शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी साडेसहा वाजता मुंबईतील शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

06 Feb, 22 11:24 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली

06 Feb, 22 11:21 AM

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वाहिली श्रद्धांजली

06 Feb, 22 11:15 AM

लता मंगेशकर यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं दु:ख

मी माझं दु:ख शब्दांत व्यक्त करू शकत नाही, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या. 'दयाळू आणि काळजी करणाऱ्या लतादीदी आपल्याला सोडून गेल्या. त्यामुळे देशात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. ती न भरून निघणारी आहे. भारतीय संस्कृतीच्या एक दिग्गज म्हणून येणाऱ्या पिढ्या त्यांना लक्षात ठेवतील. त्यांच्या सुरेल आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची क्षमता होती,' अशा शब्दांत मोदींनी लतादीदींना आदरांजली वाहिली.

06 Feb, 22 11:05 AM

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानं संपूर्ण देश शोकाकूल

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. 

टॅग्स :लता मंगेशकरबॉलिवूडमुंबई