मुंबई : गानकोकिळा लता मंगेशकर यांना अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांना मंगळवारी घरी पाठवण्यात येणार आहे.गायिका आशा भोसले यांनी रुग्णालयात लता मंगेशकर यांची भेट घेतली. सोशल मीडियावर सध्या लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी चर्चा सुरु होत्या. याला उत्तर देताना मंगेशकर यांच्या भाची रचना शहा यांनी माहिती दिली की, लता मंगेशकर यांना जंतू संसर्गाचा त्रास झाला आहे. त्यामुळेच उपचारासाठी त्यांना रविवारी मध्यरात्री रुग्णालयात नेण्यात आले आहे. ब्रीच कँडी रुग्णालय घरापासून जवळ असल्याने त्यांना तिथे दाखल करुन उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता लता मंगेशकर यांची प्रकृती ठीक असून मंगळवारी त्यांना घरी सोडण्यात येईल, अशी माहिती रुग्णालयाच्या प्रशासनाने दिली. रुग्णालयातील डॉ. फारूख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली लता मंगेशकर यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे लता मंगेशकर रुग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 6:27 AM