मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त शुक्रवारी सोशल मीडिया आणि काही टेलिव्हिजन माध्यमांतून प्रसारित झाले. मात्र, लतादीदींची प्रकृती स्थिर असून, अफवा पसरवू नका, असे आवाहन मंगेशकर कुटुंबीयांतर्फे करण्यात आले आहे. लतादीदींच्या प्रकृतीविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर मंगेशकर कुटुंबीयांतर्फे शुक्रवारी सायंकाळी एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. ‘कृपया खोट्या बातम्या पसरवू नका. लतादीदी आयसीयूमध्ये आहेत, त्यांच्यावर डॉ. प्रतित समदानी आणि टीमकडून उपचार सुरू आहेत. त्या लवकरात लवकर बऱ्या होऊन घरी परताव्यात, यासाठी प्रार्थना करूया’, असे आवाहन निवेदनातून करण्यात आले आहे.
लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 7:23 AM