लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 06:40 AM2019-11-14T06:40:15+5:302019-11-14T06:40:26+5:30
श्वसनाच्या त्रासामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती मंगेशकर कुटुंबीयांनी बुधवारी दिली.
मुंबई : श्वसनाच्या त्रासामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती मंगेशकर कुटुंबीयांनी बुधवारी दिली.
डॉ. प्रतीत समधानी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्या लवकरच घरी परततील, अशी खात्री मंगेशकर कुटुंबीयांनी व्यक्त केली. लतादीदी लवकर बऱ्या व्हाव्यात, यासाठी सर्व चाहत्यांनी आणि हितचिंतकांनी केलेल्या प्रार्थनांबाबत मंगेशकर कुटुंबीयांनी सर्वांचे आभारही मानले आहेत.
राज्यपालांच्या सदिच्छा
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी लतादीदींना पत्र लिहिले आहे. ‘तुमच्या प्रकृतीविषयी कळताच मला काळजी वाटली. तुमची प्रकृती लवकरच पूर्वपदावर येईल, अशी मला खात्री आहे,’ अशा सदिच्छा राज्यपालांनी पत्राद्वारे दिल्या आहेत.