Join us

लतादीदींची तब्येत अत्यंत उत्तम; राज ठाकरेंनी केली प्रकृतीची विचारपूस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 4:51 PM

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

ठळक मुद्दे लतादीदींनी प्रकृती अत्यंत उत्तम असून स्थिर असल्याची माहिती राज ठाकरेंनी प्रसारमाध्यमांना दिली. ल २ ते ४ दिवसात लतादीदींना बाहेर वॉर्डमध्ये शिफ्ट करतील अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे.

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. लतादीदींची प्रकृती अत्यंत उत्तम असून स्थिर असल्याची माहिती राज ठाकरेंनी प्रसारमाध्यमांना दिली. 

वयानुसार लतादीदींना हा त्रास झाला असावा तसेच वातावरणामुळे इन्फेक्शन त्यांना हा त्रास झाला असेल २ ते ४ दिवसात लतादीदींना बाहेर वॉर्डमध्ये शिफ्ट करतील अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे. श्वसनाच्या त्रासामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती मंगेशकर कुटुंबीयांनी देखील दिली आहे. डॉ. प्रतीत समधानी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लतादीदी लवकर बऱ्या व्हाव्यात, यासाठी सर्व चाहत्यांनी आणि हितचिंतकांनी केलेल्या प्रार्थनांबाबत मंगेशकर कुटुंबीयांनी सर्वांचे आभारही मानले आहेत

टॅग्स :लता मंगेशकरराज ठाकरेमुंबईहॉस्पिटलआरोग्य