Join us

एसी प्रीमियम साडेपाच तास लेट

By admin | Published: September 03, 2014 1:38 AM

मंगळवारी जनरेटरमधील बिघाडाने करमाळी एसी प्रीमियम ट्रेनला साडेपाच तासांचा लेट मार्क लागला.

मुंबई : मालगाडीचे डबे घसरल्याने मध्य आणि कोकण रेल्वेच्या ट्रेन गेल्या काही दिवसांपासून उशिराने धावत असतानाच मंगळवारी जनरेटरमधील बिघाडाने करमाळी एसी प्रीमियम ट्रेनला साडेपाच तासांचा लेट मार्क लागला. या घटनेमुळे प्रवाशांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला. 
वीर ते करंजाडीदरम्यान 24 ऑगस्ट रोजी मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले. या घटनेमुळे गेले काही दिवस कोकणात जाणा:या अनेक ट्रेन आठ ते दहा तास उशिराने धावत होत्या. तर त्यानंतर अनेक ट्रेन रद्दही करण्यात आल्या. त्याचा मोठा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागल्यानंतर मंगळवारी जनरेटरमधील बिघाडाने सीएसटी ते करमाळी या एसी प्रीमियम ट्रेनला लेट मार्क लागला. सकाळी 5 वाजता सुटणारी ट्रेन सकाळी साडेदहा वाजता सोडण्यात आली. या ट्रेनचा जनरेटर कम गार्ड ब्रेक वॅनमधील बिघाड दुरुस्त करण्यात आल्यानंतर गाडी रवाना झाली, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर यांनी सांगितले. एसी प्रीमियम ट्रेनमधून प्रवास करणा:या प्रवाशांना तोर्पयत सीएसटी स्थानकात साडेपाच तास ताटकळत राहावे लागले. समस्या काय आहे याची माहितीही त्यांना देण्यात येत नव्हती, असे प्रवाशांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
च्सीएसटीहून सकाळी 5 वाजता सुटणारी ट्रेन जनरेटरमधील बिघाडामुळे सकाळी साडेदहा वाजता सोडण्यात आली. बिघाड दुरुस्तीनंतर गाडी रवाना झाली, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर यांनी सांगितले.
 
आयआयटीचा शिक्षक दिन
मुंबई : आयआयटी मुंबईचा 56 वा शिक्षक दिन समारंभ शुक्रवारी आयआयटी कॅम्पस, दीक्षान्त सभागृह, पवई येथे होईल. हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रामास्वामी उपस्थित राहणार आहेत.