दोन्ही मार्गावरील लोकलला 'लेटमार्क'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2024 12:24 PM2024-10-11T12:24:50+5:302024-10-11T12:25:25+5:30
दोन्ही मार्गावरील प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मध्य रेल्वेच्या जलद अप मार्गावर पॉइंट फेल्युअर झाल्यामुळे गुरुवारी दुपारी अप मार्गावरील लोकल २० ते २५ मिनिटांच्या उशिराने धावत होत्या. तर, पश्चिम रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे सकाळच्या सुमारास लोकल १० ते १५ मिनिटे उशिरा चालत होत्या. त्यामुळे दोन्ही मार्गावरील प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
मुलुंड स्थानकाजवळ दुपारी १२:३४ ते १२:४६ दरम्यान पॉइट फेल्युअरची ही घटना घडली. रेल्वेने तत्काळ दुरुस्ती करून १५ मिनिटांमध्ये सेवा पूर्ववत केली. तसेच कल्याण स्थानकामध्ये कामायनी एक्स्प्रेस चेन पुलिंगमुळे फलाट क्रमांक ४ वर १० मिनिटे उभी होती. याचा परिणाम लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर झाला.
पश्चिम रेल्वेने गुरुवारी प्रवाशांच्या सुविधेसाठी १२ सेवांमध्ये वाढ केली आहे. परंतु पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाडामुळे सकाळच्या सुमारास गाड्या १० ते १५ मिनिटांच्या उशिराने चालवल्या. असे असले तरी जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पश्चिम रेल्वे मार्गावरील काही एक्स्प्रेस गाड्या उशिरा आल्यामुळे त्याचा परिणाम लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर झाला.