पश्चिम रेल्वेवरील वाहतूक उशिराने; माहीम स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 08:03 AM2019-03-08T08:03:41+5:302019-03-08T08:05:34+5:30
माहीमजवळ मालगाडीच्या इंजिनामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता.
मुंबई : तांत्रिक बिघाडामुळे वारंवार लोकल सेवा ठप्प होणारे मध्य आणि हार्बर रेल्वेचे ग्रहण आता पश्चिम रेल्वेलाही लागले आहे. गेल्या काही दिवसांत दोन वेळा लोकल उशिराने धावत आहेत. आज सकाळी 7.10 च्या सुमारास माहीम स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाला. यामुळे लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत.
Western Railway: Due to technical failure near Mahim railway station, all UP through & DOWN through trains will be running late today by about 15-20 minutes. #Mumbaipic.twitter.com/vlnBIAc2rX
— ANI (@ANI) March 8, 2019
माहीमजवळ मालगाडीच्या इंजिनामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. आता हे इंजिन बाजुला करण्यात आले आहे. हार्बर लाईनवरील अंधेरीकडे जाणारी आणि येणारी रेल्वेलाईन बंद होती. ताज्या माहितीनुसार तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला असून वाहतूक सुरु करण्यात आली आहे. मात्र, लोकल 20 मिनिटे उशिराने धावत आहेत.
Due to technical failure near Mahim station, all UP through & DOWN Through trains will be running late by about 15-20 minutes. Inconvenience is deeply regretted. @WesternRly
— DRM WR MumbaiCentral (@drmbct) March 8, 2019