‘जोक डे’च्या निमित्ताने हसा आणि हसत रहा

By admin | Published: June 30, 2015 10:26 PM2015-06-30T22:26:52+5:302015-06-30T22:26:52+5:30

मनावरचं ओझ हलके करण्यासाठी १ जुलै हा दिवस ‘जोक डे’ म्हणून साजरा करण्यात येतो. अलिकडच्या जगात दुर्मिळ झालेले हसणे हे आयुष्यात कायम ठेवण्यासाठी या डे ची निर्मिती झाली.

Laugh and laugh at the occasion of 'Joke Day' | ‘जोक डे’च्या निमित्ताने हसा आणि हसत रहा

‘जोक डे’च्या निमित्ताने हसा आणि हसत रहा

Next

ठाणे : मनावरचं ओझ हलके करण्यासाठी १ जुलै हा दिवस ‘जोक डे’ म्हणून साजरा करण्यात येतो. अलिकडच्या जगात दुर्मिळ झालेले हसणे हे आयुष्यात कायम ठेवण्यासाठी या डे ची निर्मिती झाली. हसण्याने मनावरची तसेच शरिरावरची जखम लवकर भरून येते व रूग्णही लवकर बरा होतो, असे वैद्यकीय क्षेत्रातही मानले जाते. हा दिवस साजरा करण्याची सुरूवात संयुक्त राष्ट्र संघाने केली.
जोक्स किंवा विनोद ही गोष्ट काही नवीन नाही. विनोदाची सुरुवात ग्रीक मध्ये झाली. ३०० वर्षापूर्वी या ग्रीकमध्येच विनोदाची पहिली संस्था स्थापन झाली. या संस्थेत आयात-निर्यात या विषयावर विनोद तयार केले जात असत. आजकलच्या धकाधकीच्या आणि चिंताग्रस्त जीवनात विनोद आणि हास्य महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
सोशल साईट्सवर फिरणाऱ्या विनोदांमुळेच नवीन पिढीने त्या आपल्याशा केल्या आहेत. मनातील राग, दडपण या सगळ्या गोष्टी विनोदाच्या स्वरूपात मांडल्या जात आहेत. त्याच आपल्याला चैतन्य देतात. चार्ली चॅपलीन सारखी विनोद घडवून इतरांनी हसवणारी मंडळी सगळ्यांनाच हवीहवीशी वाटत असतात. त्यामुळे प्रत्येक देशात हा दिवस उत्साहात साजरा केला जातो.

Web Title: Laugh and laugh at the occasion of 'Joke Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.