मुंबईकरांची हाैस लय भारी; ०००१ नंबरसाठी मोजतात १२ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 07:25 AM2020-12-23T07:25:28+5:302020-12-23T07:27:43+5:30

RTO : प्रत्येकाला आपल्या आवडीचा नंबर हवा असतो. काहीजण तर त्यासाठी वेगळे पैसे मोजायला तयार असतात. आरटीओ कार्यालयातून फॅन्सी नंबर घेण्यासाठी प्रचंड चढाओढ लागलेली असते.

The laughter of Mumbaikars is heavy; 12 lakhs are counted for 0001 number | मुंबईकरांची हाैस लय भारी; ०००१ नंबरसाठी मोजतात १२ लाख

मुंबईकरांची हाैस लय भारी; ०००१ नंबरसाठी मोजतात १२ लाख

Next

मुंबई : गेल्या काही वर्षांत फॅन्सी नंबर घेण्याकडे वाहनधारकांचा ओढा आजही कायम आहे. मुंबईकर या फॅन्सी नंबरप्लेटसाठी हजारो रुपये मोजत आहेत. त्यात १ नंबर मुंबईकरांचा आवडीचा असून त्यासाठी ते ४ लाख ते १२ लाख खर्च करत आहेत. 
प्रत्येकाला आपल्या आवडीचा नंबर हवा असतो. काहीजण तर त्यासाठी वेगळे पैसे मोजायला तयार असतात. आरटीओ कार्यालयातून फॅन्सी नंबर घेण्यासाठी प्रचंड चढाओढ लागलेली असते. एकाच नंबरसाठी अनेकदा जास्त अर्ज येतात. अशावेळी नंबरचा लिलाव केला जातो. 
लाखो रुपये मोजून नंबर घेतला जात आहे. त्यात आता वाहनांच्या आकर्षक नंबरसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ होण्याचे संकेत मिळाले आहे. त्यामुळे पसंती नंबरसाठी 
चांगलीच कात्री लागण्याची शक्यता आहे. 
मुंबईकरांची विविध नंबरला पसंती वाहनधारकांचा ९, ९९, ९९९,९९९९, ७८६, ८०५५,००५५,४५४५अशा विविध नंबरकडेही ओढा दिसतो. अनेक जण जन्म तारीख, आपल्या पूर्वीच्या वाहनाचा क्रमांक घेण्यासही प्राधान्य देतात. सर्वसामान्य वाहनधारकांकडून १५ ते ५० हजारांदरम्यान शुल्क असलेला नंबर घेण्यास प्राधान्य दिले जाते. 

ताडदेव आरटीओची कमाई 
२०१९  ६ कोटी २५ लाख १४ हजार रुपये 
२०२०  ४ कोटी ४९ लाख ६९ हजार रुपये 

बोरीवली आरटीओची कमाई 
२०१९  ४ कोटी १५ लाख रुपये 
२०२०  २ कोटी १० लाख ४६ हजार

- लाखो रुपये मोजून नंबर घेतला जात आहे.  आकर्षक नंबरसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे पसंती नंबरसाठी चांगलीच कात्री लागण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक दर
पसंती क्रमांक    चारचाकी     दुचाकी 
०००१     ४ लाख     ५० हजार
९०, ०९९, ०७८    १.५ लाख     २० हजार 
०१११, ०२२२, ०३३३    ७० हजार     १५ हजार 
०००२, ०००३, ०००४    ५० हजार     १० हजार 

दुचाकीचा नंबर चारचाकीला घेण्यासाठी तिप्पट पैसे
पसंतीच्या नंबरसाठी अर्ज मागविण्यात येतात. काही ठरावीक नंबरकडे वाहनचालकांचा ओढा अधिक पाहायला मिळतो. वाहनचालकाला चारचाकी वाहनांचा हवा असलेला एखादा नंबर उपलब्ध नसेल आणि तो दुचाकीच्या सीरिजमध्ये उपलब्ध असेल तिप्पट पैसे मोजावे लागतात. चारचाकीचा सर्वाधिक दर ४ लाख आहे, पण तो क्रमांक उपलब्ध नसेल आणि दुचाकी सीरिजमध्ये असेल तर १२ लाख रुपये मोजावे लागतात. 
- प्रदीप शिंदे, 
आरटीओ अधिकारी, ताडदेव 

Web Title: The laughter of Mumbaikars is heavy; 12 lakhs are counted for 0001 number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई