ई-चलनमार्फ त कारवाईला चालना

By admin | Published: May 22, 2015 10:52 PM2015-05-22T22:52:24+5:302015-05-22T22:52:24+5:30

वाहतूक पोलिसांनी गेल्या आठ महिन्यांत १७१२ जणांवर ई - चलनमार्फत कारवाई केली आहे.

Launch of action by e-challan | ई-चलनमार्फ त कारवाईला चालना

ई-चलनमार्फ त कारवाईला चालना

Next

सूर्यकांत वाघमारे ल्ल नवी मुंबई
वाहतूक पोलिसांनी गेल्या आठ महिन्यांत १७१२ जणांवर ई - चलनमार्फत कारवाई केली आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सीसीटीव्हीमार्फत नजर ठेवून त्यांना दंडाची पावती घरपोच पाठवण्यात आली आहे. त्यामध्ये चालू वर्षात सर्वाधिक बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई झाली आहे.
सुरक्षेच्या अनुषंगाने महापालिकेने शहरात सीसीटीव्हीचे जाळे बसवले आहे. त्या माध्यमातून शहरातील प्रत्येक गैरहालचालीवर नजर ठेवण्याचे काम पोलीस करीत आहेत. त्यापैकी अनेक कॅमेरे वाहतूक पोलिसांनाही कारवाईसाठी उपयुक्त ठरत आहेत. चौक, सिग्नल अशा ठिकाणी बसवलेल्या या कॅमेराच्या माध्यमातून पोलिसांनी गेल्या ८ महिन्यांत १,७१२ जणांवर ई-चलन कारवाई केली आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक पोलीस दिसत नसल्याची संधी साधून सिग्नल तोडणाऱ्या तसेच वाहन चालवताना मोबाइलवर बोलणाऱ्या चालकांना चांगलाच धक्का बसला आहे. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या प्रत्येकाला अडवून त्याच्याकडून दंड आकारणे शक्य नाही. त्यामुळे ठिकठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये असे बेशिस्त वाहनचालक दिसताच त्यांना घरपोच दंडाची रक्कम पाठवली जात आहे. आॅगस्ट २०१४ मध्ये या कारवाईला प्रथमच सुरुवात करण्यात आली होती. त्यानुसार गतवर्षाच्या सरत्या चार महिन्यांत ६७३ जणांवर ही कारवाई झाली होती. त्यापैकी ५२ जणांनी दंडाची रक्कम न भरल्याने त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. तर चालू वर्षाच्या अवघ्या चार महिन्यांत १,०३९ जणांवर ई-चलनअंतर्गत कारवाई झाली आहे. त्यापैकी ४१४ चलन गेल्या काही दिवसांत पाठवले असून, ते पोस्टात प्रलंबित आहेत. तर १७८ जणांनी आॅनलाइन प्रक्रियेतून दंडाची रक्कम भरली आहे. तसेच २३० जणांचे पत्तेच अपूर्ण असल्याने त्यांचे ई-चलन वाहतूक पोलिसांकडे परत आले आहेत.
सुरुवातीला पामबीच मार्गावरच ही कारवाई केली जायची. मात्र संपूर्ण शहरात सीसीटीव्हीचे जाळे पसरले असून, त्याचा नियंत्रण कक्ष देखील पोलिसांकडेच असल्याने सर्वच ठिकाणी अशा कारवायांवर वाहतूक पोलिसांनी भर दिला आहे. त्यामध्ये सिग्नल तोडणे, सीटबेल्ट न वापरणे, वाहन चालवताना फोनवर बोलणे, हेल्मेट न वापरणे अशा अनेक कारणांचा समावेश असल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त अरविंद साळवे यांनी सांगितले.

Web Title: Launch of action by e-challan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.