उत्तर मुंबईतील दुर्गम भागातील लसीकरणासाठी वातानुकूलित वॅक्सिनेशन, मोबाइल हेल्प व्हॅन सेवेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:06 AM2021-06-01T04:06:26+5:302021-06-01T04:06:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : उत्तर मुंबईतील झोपडपट्टी व दुर्गम भागात लसीकरण वेगाने व्हावे यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उत्तर मुंबईतील झोपडपट्टी व दुर्गम भागात लसीकरण वेगाने व्हावे यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर मुंबई युवक काँग्रेसतर्फे उत्तर मुंबईमध्ये साेमवारी वातानुकूलित वॅक्सिनेशन मोबाइल हेल्प व्हॅन सेवा सुरू करण्यात आली.
भाई जगताप यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन झाले. या वॅक्सिनेशन मोबाइल हेल्प व्हॅन सेवेमुळे उत्तर मुंबईतील झोपडपट्टी व दुर्गम भागातील जनतेच्या दारोदारी जाऊन त्यांची लसीकरणासाठी नोंदणी करणे शक्य होईल.
यावेळी चरणसिंग सप्रा, सरचिटणीस संदेश कोंडविलकर, उत्तर मुंबई युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष अमनदीप सैनी, विजय शिंगे, आशिष आदलिंगे, धीरज आचार्य, ध्रुव नाईक व रितेश रायचुरा उपस्थित होते.
-------------------------------------------