CoronaVirus News: राज्यात विमान सेवेला प्रारंभ; मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापुरातून उड्डाणे सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 03:42 AM2020-05-26T03:42:29+5:302020-05-26T06:30:03+5:30
मुंबईसह पुणे, नागपूर आणि कोल्हापूर येथून विमान सेवा सुरू झाली आहे.
मुंबई : लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून स्थगित असणारी राज्यातील विमानसेवा सोमवारपासून पूर्ववत सुरू झाली. मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वरून एकूण ४७ विमानांची वाहतूक झाली. देशभरातील १४ शहरांतून ७ विमान कंपन्यानी उड्डाणे झाली. त्यात सर्वाधिक ये-जा दिल्ली-मुंबई मार्गावर होती. प्रवाशांना विमानतळावर फेसशिल्ड, मास्क, ग्लोज पुरविण्यात आले होते. तसेच त्यांच्या साहित्यावर सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली.
मुंबईसह पुणे, नागपूर आणि कोल्हापूर येथून विमान सेवा सुरू झाली आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे औरंगाबाद येथून ही सेवा अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. मुंबईतून ४८५२ प्रवाशांनी आज प्रवास केला. त्यात ३७५२ प्रवासी विविध शहरात रवाना झाले. तर ११०० प्रवासी मुंबईत आले. तर अलायंस एअरकडून हैदराबाद-कोल्हापूर मार्गावरील सेवेचा प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी एकूण ३२ जणांनी प्रवास केला. हैदराबादहून आलेल्या ११ प्रवाशांना जिल्हा प्रशासनाने वैद्यकीय तपासणीसाठी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये नेले.
दिल्ली येथून आले पहिले विमान
दिल्ली येथून आलेले पहिले विमान पुणे विमानतळावर उतरले. दिवसभरात पुण्यातून अन्य शहरांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांचीच संख्या येणाऱ्यांपेक्षा जवळपास दुप्पट होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर ये-जा करणाºया प्रवाशांची कसून तपासणी करूनच त्यांना प्रवेश दिला जात आहे. दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळÞुरू, जयपूर, कोचीन, हैदराबाद व अहमदाबाद या शहरांसाठी विमानांचे उड्डाण सुरू झाले आहे.