Join us

कांदिवलीत 'लसीकरण केंद्र आपल्या दारी' अभियानाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 4:05 AM

मुंबई : लसीकरण केंद्रावर वाढत चाललेली गर्दी कमी व्हावी व नागरिकांना ते राहत असलेल्या ठिकाणीच लस मिळावी याकरिता आमदार ...

मुंबई : लसीकरण केंद्रावर वाढत चाललेली गर्दी कमी व्हावी व नागरिकांना ते राहत असलेल्या ठिकाणीच लस मिळावी याकरिता आमदार अतुल भातखळकर यांच्या वतीने 'लसीकरण केंद्र आपल्या दारी' अभियान सुरू केले आहे. लोखंडवाला येथील ऑक्टाक्रेस्ट व सियरा टॉवर या ठिकाणी या अभियानाचे उद्घाटन आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

गृहनिर्माण संस्थांमध्ये लस मिळत असल्यामुळे व रांगेत ताटकळत थांबण्याची आवश्यकता नसल्यामुळे नागरिकांनी या अभियानाबद्दल समाधान व्यक्त केले.

लसीकरण केंद्र आपल्या दारी या अभियानांतर्गत दिवसाला किमान १000 लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून, हे अभियान संपूर्ण कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात राबविणार असल्याचे आमदार भातखळकर म्हणाले.

याप्रसंगी सुधीर शिंदे, अश्विन अहिरे, कॅ. पंकज शुक्ला, राजेश शर्मा आदी भाजपाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

--*---------*-------------------*-------