Join us  

उत्तर मुंबईत वयोश्री योजनेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 4:08 AM

मुंबई : भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने ज्येष्ठ नागरिकांना लागणारे अनेक जीवनावश्यक उपकरण निःशुल्क देण्याची राष्ट्रीय वयोश्री ...

मुंबई : भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने ज्येष्ठ नागरिकांना लागणारे अनेक जीवनावश्यक उपकरण निःशुल्क देण्याची राष्ट्रीय वयोश्री योजना आखली आहे. ज्येष्ठ नागरिकांना एक नाहीतर अनेक उपकरणाचे वाटप करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. भारतीय जनता पक्ष उत्तर मुंबईतर्फे या योजनेसंदर्भात येथील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांचे मेडिकल चेकअप करण्यात येणार आहे.

खासदार गोपाळ शेट्टी यांच्या प्रयत्नांनी हा उपक्रम उत्तर मुंबईत राबविण्यात येणार आहे.

या उपक्रमाचे उद्घाटन डॉ.रन्नाबेन दोशी यांच्या हस्ते बोरीवली पश्चिम, बाभई आचार्य नरेंद्र देव शाळा येथे करण्यात आले.

उत्तर मुंबईचे भाजप कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी यांनी आपआपल्या वॉर्डातील कार्यालयात वरिष्ठ नागरिकांचे फॉर्म भरून घेतले आहे. फॉर्म भरलेल्या नागरिकांची चिकित्सकद्वारे चाचणी करून, त्यांना लागणारे उपकरण तयार करून दिले जातील. ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी काठी (स्टिक), कवळी, चश्मा, श्रवण यंत्र, व्हीलचेअर, नवीन प्रकारचे डायबिटिक शूज, कमोड खुर्ची इत्यादी अनेक उपकरण या योजनेत समाविष्ट आहे.