विधि तीन वर्षे अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 02:37 AM2019-07-24T02:37:49+5:302019-07-24T02:37:57+5:30

राज्यातील विधि महाविद्यालयांतील प्रवेशासाठी सीईटी सेलने घेतलेल्या तीन वर्षे अभ्यासक्रमाची परीक्षा ३६,५१३ विद्यार्थ्यांनी दिली होती.

Law admission process of three years courses soon | विधि तीन वर्षे अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया लवकरच

विधि तीन वर्षे अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया लवकरच

googlenewsNext

मुंबई : प्रवेश परीक्षेचा निकाल लागून महिला उलटल्यानंतर अखेर विधि तीन वर्षे अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया बुधवारपासून सुरू होत आहे. प्रवेशाचे वेळापत्रक तयार झाले असून, गुरुवारपासून अर्ज भरण्यास आणि नोंदणीला प्रारंभ होईल, असे सीईटी सेलमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यातील विधि महाविद्यालयांतील प्रवेशासाठी सीईटी सेलने घेतलेल्या तीन वर्षे अभ्यासक्रमाची परीक्षा ३६,५१३ विद्यार्थ्यांनी दिली होती. या परीक्षेचा निकाल १७ जूनला जाहीर झाला. मात्र मुंबई विद्यापीठाचे निकाल रखडल्याने सीईटी सेलकडून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात विलंब होत होता. गतवर्षी राज्यातील विविध विद्यापीठांचे निकाल जाहीर होण्यापूर्वी प्रवेश प्रक्रिया राबविल्याने अनेक विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे यंदा निकाल जाहीर झाल्याशिवाय प्रवेश प्रक्रिया सुरू न करण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला होता. परंतु विद्यार्थ्यांकडून मागणी होत असल्याने अखेर ही प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे. त्यानुसार मंगळवारी मध्यरात्रीपासून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करता येईल. तसेच प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकही संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सीईटी सेलने दिली.

पाच वर्षे अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
आरक्षणाच्या गोंधळामुळे रखडलेली विधि पाच वर्षे अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. प्रवेशाचे वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) जाहीर केले आहे. त्यानुसार बुधवार,२४ जुलै रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल.
वेळापत्रकानुसार अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची सर्वसाधारण यादी ३० जुलैला ३ वाजता जाहीर होईल. याबाबत विद्यार्थ्यांना काही तक्रारी असल्यास ते ३१ ते २ आॅगस्टपर्यंत वैयक्तिक लॉगइनमधून आॅनलाइन तक्रार करू शकतील. तर १३ आॅगस्टला प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल.

या यादीत प्रवेश मिळणाºया विद्यार्थ्यांना १४ ते २० आॅगस्ट या कालावधीत महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा लागेल. तसेच त्यांना २० आॅगस्टला जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

Web Title: Law admission process of three years courses soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.