विधि तीन वर्ष सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:16 AM2020-12-04T04:16:32+5:302020-12-04T04:16:32+5:30
पहिल्या दहा उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ९ मुली लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) घेण्यात ...
पहिल्या दहा उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ९ मुली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या विधि तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. या निकालात मुग्धा पटवर्धन, युक्ती अरोरा, अनिरुद्ध शिधये आणि वृंदा भोला यांनी ११८ गुण मिळवत बाजी मारली आहे. गुणवत्ता यादीतील पहिल्या १० उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ९ मुली आहेत.
२ आणि ३ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेसाठी राज्यभरातून ५५,४६७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यापैकी ४३,५७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पहिल्या आलेल्या चार विद्यार्थ्यांनी १५० पैकी झालेल्या परीक्षेत ११८ गुण मिळविले. त्यापाठोपाठ ११४ गुण मिळविणारे २ आणि ११२ गुण मिळविणारे ७ तसेच १११ गुण मिळविणारे १० विद्यार्थी आहेत. २२ विद्यार्थ्यांना शून्य गुण आणि १ गुण १० विद्यार्थ्यांना मिळाला. विद्यार्थी सीईटी सेलच्या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतात.
...