'सदस्यांतून सरपंच निवडीबाबत अधिवेशनात कायदा, तर विखेही आमच्याकडे येतील'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 02:48 AM2020-02-22T02:48:19+5:302020-02-22T02:48:42+5:30

पत्रकार परिषदेत मुश्रीफ यांच्या बाजूलाच खासदार सुजय विखे हेही बसले होते

Law on the Convention on the Election of Sarpanch from Members - Musharraf | 'सदस्यांतून सरपंच निवडीबाबत अधिवेशनात कायदा, तर विखेही आमच्याकडे येतील'

'सदस्यांतून सरपंच निवडीबाबत अधिवेशनात कायदा, तर विखेही आमच्याकडे येतील'

Next

अहमदनगर : सरपंच निवड सदस्यातून करण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय कायम आहे. याबाबतची मागणी राज्यपालांनी फेटाळली म्हणण्यापेक्षा त्यांनी रितसर सभागृहात याबाबत कायदा करा असे म्हटले आहे. त्यानुसार २४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरपंच निवडीबाबतचा कायदा केला जाईल, अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

पालकमंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत येथे आढावा बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘महाविकास आघाडीचे सरकार सहा महिन्यांत पडेल’ या देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर मुश्रीफ म्हणाले, फडणवीस व चंद्रकांत पाटील यांना भाजपचेच सरकार येणार अशी पूर्ण खात्री होती. परंतु त्यांचा भ्रमनिराश झाला. त्यामुळे आताही त्यांच्या डोक्यात रात्रं-दिवस सत्तेचेच गुºहाळ सुरू असते. त्यातून ते अशी विधाने करतात. सरकार हे शरद पवार, सोनिया गांधी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनातील सरकार आहे. त्यामुळे पुढील १५ वर्षे टिकणार आहे.

विखेही आमच्याकडे येतील!

पत्रकार परिषदेत मुश्रीफ यांच्या बाजूलाच खासदार सुजय विखे हेही बसले होते. ‘आमचे सरकार पुढील १५ वर्षे टिकेल व त्यात विखेही असतील. कारण तेही मूळचे काँग्रेसी विचारधारेचेच आहेत’, असे मुश्रीफ यांनी सांगताच एकच हशा पिकला. या विधानाने सुजय विखे यांनाही हसू आवरले नाही.

Web Title: Law on the Convention on the Election of Sarpanch from Members - Musharraf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.