विधि, ‘सीएस’च्या परीक्षांचे दोन पेपर एकाच दिवशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 06:01 AM2017-11-20T06:01:11+5:302017-11-20T06:03:43+5:30

मुंबई : एसवाय बीकॉम आणि सीएच्या परीक्षांपाठोपाठ विधि अभ्यासक्रमाच्या आणि सीएसच्या परीक्षांच्या वेळापत्रकांमध्ये दोन पेपर एकाच दिवशी असल्याने नवीन गोंधळ समोर आला आहे.

The law, two papers of 'CS' exams on the same day | विधि, ‘सीएस’च्या परीक्षांचे दोन पेपर एकाच दिवशी

विधि, ‘सीएस’च्या परीक्षांचे दोन पेपर एकाच दिवशी

Next

मुंबई : एसवाय बीकॉम आणि सीएच्या परीक्षांपाठोपाठ विधि अभ्यासक्रमाच्या आणि सीएसच्या परीक्षांच्या वेळापत्रकांमध्ये दोन पेपर एकाच दिवशी असल्याने नवीन गोंधळ समोर आला आहे. विधि अभ्यासक्रमाच्या तिसºया सत्राच्या परीक्षा २१ आणि २३ डिसेंबरला होणार असून त्याच दिवशी सीएसचे पेपर असल्याने विद्यार्थी कोंडीत अडकले आहेत.
सीएसचे वेळापत्रक हे सहा महिने आधीच जाहीर झाले आहे, तर विद्यापीठाने काही दिवसांपूर्वीच विधि अभ्यासक्रमाच्या तिसºया सत्राचे वेळापत्रक जाहीर केले आहे. २१ डिसेंबरला विधिचा ट्रान्सफर आॅफ प्रॉपर्टी अ‍ॅक्ट हा पेपर दुपारी ३ ते सायं. ६ या वेळेत आहे, तर सीएसचा लॉ अ‍ॅण्ड प्रॅक्टिस हा पेपर दुपारी २ ते सायं. ५ या वेळात होणार आहे. २३ डिसेंबरला विधि अभ्यासक्रमाचा ‘कंपनी लॉ’चा पेपर आहे, तर सीएसचा आयटीचा पेपर आहे. दोन्ही पेपर एकाच वेळात होणार आहेत. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.
स्टुण्डट लॉ कौन्सिलने विधि अभ्यासक्रमाच्या तारखा बदलण्यासाठी विद्यापीठाला पत्र दिले आहे. पण विद्यापीठाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा स्टुण्डट लॉ कौन्सिलने दिला आहे.

Web Title: The law, two papers of 'CS' exams on the same day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.