सुरेश लोखंडे - ठाणेजिल्हा विभाजनानंतर येत्या ३१ जानेवारीपूर्वी ठाणे व पालघर या दोन्ही जिल्हा परिषदांची निवडणूक होणे अपेक्षित होते़ मात्र, अद्याप त्याबाबत काहीच हालचाल झालेली नसून आता निवडणुकीपूर्वी आचारसंहितेसाठी द्यावा लागणारा ४० ते ४५ दिवसांचा पुरेसा कालावधी मिळण्याची चिन्हे मावळल्याने ही निवडणूक लांबणीवर पडणार आहे़निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदांच्या निवडणूक कार्यक्रम का घोषीत केला नाही, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही जिल्ह्यांमधील सुमारे ३३ ग्रामपंचायतींचे नगरपालिका किंवा नगरपरिषदांमध्ये रूपांतराचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे़ यामुळे ३१ जानेवारीनंतर त्याचा निर्णय झाला तरी पंचायत समित्यांचे गण आणि जिल्हा परिषदेच्या गटांच्या रचनेत बदल करावा लागणार आहे़ यामुळे पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल़ ही झंझट करण्यापेक्षा काही दिवस निवडणूक पुढे ढकलून नगरपालिकांच्या प्रस्तावावर निर्णय झाल्यानंतरच ठाणे-पालघर जिल्हा परिषदेची निवडणूक घेणे प्रशासकीयदृष्ट्या सोयीचे होणार आहे़ यामुळेच ३१ जानेवारी पूर्वी आयोगाने या जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम घोषीत केला नसल्याचे सांगण्यात येत आहे़ ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये सुमारे ९४२ ग्रामपंचायतींपैकी तीन ग्रामपंचायतींचा समावेश नगरपालिकांमध्ये होणार असून सुमारे ३० ग्रामपंचायतींच्या नगरपंचायतीं होणार आहे. या ३३ ग्राम पंचायतींच्या नगरपालिका व नगरपंचायतीं प्राधान्याने अस्तित्वात आणणे आवश्यक आहे. त्याचा निर्णय घेतल्याशिवाय जि. प. व पंचापयत समित्यांच्या निवडणुका घेणे शक्य नाही. यामध्ये पालघर जिल्ह्यातील दहा ग्रामपंचायतींचे प्रस्ताव नगरपंचायतींसाठी तर नगरपालिकेसाठी एका ग्राम पंचायतीचा प्रस्ताव राज्य शासनास देण्यात आला आहे. याशिवाय ठाणे जिल्हातील दोन ग्राम पंचायतींचे नगरपालिका व २० ग्रामपंचायतींचे प्रस्ताव नगरपंचायतीसाठी जिल्हा परिषदेव्दारे राज्य शासनाला सादर करण्यात आलेले आहेत. याशिवाय आणखी काही ग्राम पंचायतींचे प्रस्ताव नगरपालिका व नगरपंचायतींसाठी सादर केले जाणार आहे. यामुळे ग्रामपंचायतींच्या नगरपालिका, नगरपंचायती निर्माण करण्याच्या संख्येत वाढ होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यांची लोकसंख्या एक कोटी दहा लाख आहे. यामध्ये सात महापालिकांसह पाच नगरपालिकांची शहरी लोकसंख्या अधिक आहे. पण या शहरी भागाला लागून असलेल्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. महापालिकांचा वाढता ताण या ग्राम पंचायतींना सोसावा लागत आहे. यानुसार ग्राम पंचायतींची लोकसंख्या २०११च्या जनगणनेमध्ये वाढलेली आहे. यामध्ये २५ हजार लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्राम पंचायती नगरपालिका होण्यास पात्र ठरल्या आहेत. तर १० हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्राम पंचायती आता नगरपंचायती होण्यास पात्र ठरल्या आहे. यानुसार संबंधीत ग्राम पंचायतींनी प्रस्ताव सादर केले आहेत.नगरपालिकेसाठी पात्र ग्रामपंचायतीतालुकग्रामपंचायतपालघरभोईसर, खैराभिवंडीखोणीकल्याणपिसवली, नांदिवली पंचानंदतालुकाग्राम पंचायतींतलासरीउपलाडडहाणूचिंचणीपालघरसातपाटी, माहिम, काटकर,सालवड, मनोर, पास्थळ,वसईअर्नाळा, कोपरीभिवंडीशेलार, काटई, कारीवली,राहनाळ, काल्हेर, कोनतालुकाग्राम पंचायतींशहापूरकसारा, वाशिंद, आसनगांवकल्याणगोळवली, आजदे,भोपर, सागाव, सोनारपाडा, निळजेअंबरनाथचिंचेचा पाडा, आशेळे, वांगणीवाडावाडामुरबाडमुरबाड
लॉरेन्स डिसोझा यांचे नगरसेवकपद धोक्यात
By admin | Published: January 03, 2015 11:42 PM