मुंबई : प्रसिद्ध विज्ञान कथा लेखक लक्ष्मण लोंढे यांचे गुरुवारी दुपारी २ वाजता दादर धन्वंतरी रूग्णालयात निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात लेखिका पत्नी स्वाती लोंढे, मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. खासगी बँकेत काम केल्यानंतर पूर्ण वेळ लेखन करण्यासाठी लोंढे यांनी वयाच्या ५०व्या वर्षीच स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. दुसरा आईन्स्टाईन, वाळूचे गाणे, रिमोट कंट्रोल, नव्या शतकाच्या उंबरठ्यावर, आभाळ फाटलंय अशी अनेक पुस्तके लोंढे यांच्या नावावर आहेत. विज्ञान कथा, विज्ञान कादंबरी, विज्ञान नाटक आणि विज्ञानातील विविध विषयांवर त्यांनी लेख लिहिले.
लक्ष्मण लोंढे याचे निधन
By admin | Published: August 07, 2015 1:37 AM