Join us

लय भारी... नवरात्र उत्सवात आता सलग तीन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक

By मनोहर कुंभेजकर | Published: October 20, 2023 3:04 PM

मेट्रो मार्गिका २ ए आणि मेट्रो मार्गिका क्रमांक ७ या दोन्ही मेट्रो सेवा उत्सव काळात मध्यरात्री उशिरा पर्यंत सुरू राहणार

मनोहर कुंभेजकर                                                                                                                                

मुंबई -सध्या सगळीकडे गरब्याची धुम सुरू आहे... दरदिवशी विविध मंडळे तसेच विविध राजकीय पक्षांतील नेत्यांनी आयोजित केलेल्या गरब्याला गरबा रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आता उपनगर जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांनी आज परिपत्रक काढून नवरात्रौत्सवात  उद्या शनिवार दि,21,रविवार दि,22 आणि सोमवार दि,23 रोजी सलग तीन दिवस रात्री 12 वाजे पर्यंत ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक लावण्यास परवानगी दिली आहे.याआधी रविवार दि,22 आणि सोमवार दि,23 रोजी दोनच दिवस सदर परवानगी होती.आता सलग तीन दिवस रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी मिळाल्याने गरबा प्रेमीच्या आनंदाला उधाण आले आहे.

या संदर्भात उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सदर मागणी  आणि मेट्रो मार्गिका २ ए आणि मेट्रो मार्गिका क्रमांक ७ या दोन्ही मेट्रो सेवा उत्सव काळात रात्री १२ वाजेपर्यंत सुरु ठेवाव्यात अशी मागणी  केली होती. या दोन्ही मागण्या मान्य झाल्या आहेत.तसे वृत्त देखिल लोकमत ऑनलाईन आणि लोकमत मध्ये प्रसिद्ध झाले होते.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे लोकभिमुखं असून कि याचा प्रत्यय पुन्हा यानिमित्ताने आला असून आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देत असल्याचे खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले.

मध्यरात्रीपर्यंतच्या मेट्रो सेवेचा लाभ घ्यावा

हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्वाचा असलेला नवरात्रोत्सव  उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो मार्गिका २ ए आणि मेट्रो मार्गिका क्रमांक ७ या दोन्ही मेट्रो सेवा उत्सव काळात रात्री १२ वाजेपर्यंत सुरु ठेवाव्यात अशी मागणी आपण शासनाकडे केली होती ती मान्य झाली आहे.

नवरात्र उत्सवासाठी मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वर १४ अतिरिक्त सेवांची वाढ

नवरात्र उत्सवादरम्यान मुंबई मेट्रो मार्ग २ अ आणि ७ या मेट्रो मार्गांवर अतिरिक्त सेवा सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष  एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी लाखो नागरीक घराबाहेर पडतात. या काळात  त्यांना रात्रीच्या वेळी प्रवास करावा लागतो. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुलभ आणि सुरक्षित करण्याच्यादृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार दि, १९ ऑक्टोबर ते दि,२३ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीत मेट्रो मार्ग २ अ च्या अंधेरी पश्चिम आणि मेट्रो मार्ग ७ च्या गुंदवली या स्थानकांवरून शेवटची मेट्रो ही १२:२० वाजता सोडण्यात येणार आहे. 

कशी असेल ही मेट्रो ची अतिरिक्त सेवा

१९ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीत सुमारे १५ मिनिटांच्या अंतराने एकूण १४ अतिरिक्त सेवांचा समावेश असणार आहे. सध्या मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वर गुंदवली ते अंधेरी पश्चिम दरम्यान सोमवार-शुक्रवार सकाळी ५:५५ ते रात्री १०:३० या कालावधीत सुमारे २५३ इतक्या सेवा या साडेसात ते साडे दहा  मिनिटांच्या अंतराने सुरू आहेत. तसेच शनिवारी २३८ आणि रविवार २०५ इतक्या सेवा या ८ ते साडे दहा मिनिटांच्या अंतराने सुरू आहेत.

नवरात्र उत्सवाच्या कालावधीत दिनांक १९ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर, २०२३ दरम्यान नियमित सेवांनंतर १५ मिनिटांच्या अंतराने १४ अतिरिक्त सेवा सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे या अतिरिक्त सेवांच्या कालावधीत मेट्रो मार्ग २अ वरील अंधेरी (पश्चिम) आणि मेट्रो मार्ग ७ वरील गुंदवली या स्थानकावर शेवटची मेट्रो ही रात्री ०१:३० वाजता पोहचेल. अतिरिक्त सेवांमध्ये कामाच्या दिवशी २६७ सेवा तर सुट्टीच्या दिवशी या सेवा २५२ इतक्या असतील. याचा पश्चिम उपनगरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन खासदार गोपाळ शेट्टी यांनी केले आहे.

टॅग्स :मुंबईनवरात्री