एसी लोकलमध्ये एलसीडी ; नव्याने दाखल होणा-या लोकलमध्ये सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 04:22 AM2018-01-22T04:22:11+5:302018-01-22T04:28:05+5:30
गर्दीने गच्च भरलेल्या लोकल, दरवाजाजवळ लटकणारे प्रवासी ही मुंबई लोकलची ओळख पुसण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) तयारी करत आहे.
महेश चेमटे
मुंबई : गर्दीने गच्च भरलेल्या लोकल, दरवाजाजवळ लटकणारे प्रवासी ही मुंबई लोकलची ओळख पुसण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) तयारी करत आहे. मुंबई शहर वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी ३ अ) अंतर्गत २१० वातानुकूलित (एसी) लोकल एमआरव्हीसीकडून खरेदी करण्यात येणार आहेत. या वातानुकूलित लोकलमध्ये ‘माहिती आणि मनोरंजन/ज्ञानरंजन’ (इन्फोटेनमेंट) देणाºया सुविधेवर भर देण्यात येणार आहे. यासाठी नव्याने दाखल होणाºया एसी लोकलमध्ये एलसीडी बसविण्याचा विचार एमआरव्हीसी करत आहे. त्याचबरोबर एसी लोकलमध्ये प्रवाशांना मोफत वाय-फाय मिळण्याची शक्यता आहे.
एमयूटीपी-२ ची बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे एमआरव्हीसीकडून एमयूटीपी ३ अ ला मंजुरी मिळावी, यासाठी रेल्वे बोर्डात मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. एमयूटीपी ३ अ प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे ४९ हजार ५२४ कोटी रुपये आहे. या प्रकल्पाला यंदाच्या अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्यास २०२२ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल. या प्रकल्पामुळे उपनगरीय लोकल सेवेचा चेहराच बदलणार आहे.
यामुळे एमआरव्हीसीच्या अधिकाºयांमध्ये हा प्रकल्प सध्या चर्चेचा विषय आहे.
मुंबई लोकलचे भविष्य हे वातानुकूलित आहे, असे मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. जैन यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, यासाठी विशिष्ट आराखडा तयार झाला नाही, असे जैन यांचे म्हणणे आहे. पश्चिम रेल्वेवर देशातील पहिली वातानुकूलित लोकल धावत आहे. मात्र, या लोकलला अद्याप हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. प्रवासी संख्येत वाढ व्हावी, यासाठी रेल्वे बोर्डाने प्रथम दर्जाच्या पास आणि तिकीट धारकांना एसी लोकलच्या फरकाचे पैसे भरून प्रवास करण्याची मुभा दिली आहे. यामुळे लवकरच एसी लोकलला अपेक्षित प्रतिसाद मिळेल, असा विश्वास एमआरव्हीसी आणि पश्चिम रेल्वेचे अधिकारी व्यक्त करत आहे.
हार्बर मार्गावर सीबीटीसी यंत्रणा-
मध्य रेल्वे अखत्यारीत येणाºया परंतु कायम दुर्लक्षित समजल्या जाणाºया हार्बर रेल्वे मार्गासाठी एमयूटीपी ३ अ प्रकल्पामध्ये १ हजार ३९१ कोटी रुपयाची सीबीटीसी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. यामुळेच या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रवाशांना याचा फायदा होईल.
49524
हजार कोटी रुपयांचा एमयूटीपी
३ अ हा प्रकल्प आहे. लोकल खरेदीसाठी १७ हजार ८५९ कोटी रुपयांची तरतूद आहे. तर लोकल देखभालीसाठी २ हजार ३८८ कोटी रुपये खर्च करण्यात येतील. या प्रकल्पांमुळे कल्याण-आसनगाव आणि कल्याण-बदलापूर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. यासाठी अनुक्रमे १ हजार ७९५ कोटी आणि १ हजार ४१४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.