Join us

बनावट नोटांच्या तस्करी प्रकरणातील म्होरक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:09 AM

एटीएसच्या जाळ्यातएटीएसच्या जाळ्यातलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बनावट नोटांच्या तस्करी प्रकरणातील प्रमुख आरोपीला ७ वर्षांनी राज्य दहशतवादविरोधी ...

एटीएसच्या जाळ्यात

एटीएसच्या जाळ्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बनावट नोटांच्या तस्करी प्रकरणातील प्रमुख आरोपीला ७ वर्षांनी राज्य दहशतवादविरोधी पथकाने शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये बेड्या ठोकल्या आहेत. यात, अताऊर अयुब अली रेहमान (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

एटीएसने बनावट नोटांंप्रकरणी १२ एप्रिल २०१४ रोजी ७ आरोपींना अटक करत त्यांच्याकड़ून ५ लाख १७ हजार बनावट नोटा जप्त केल्या होत्या. अटकेतील आरोपींविरोधात दोषारोपपत्र देखील दाखल करण्यात आले आहे. यातच रेहमान हा मुख्य आरोपी असल्याचे तपासात समोर आले. एटीएसने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात देखील रेहमानचा पाहिजे आरोपी म्हणून उल्लेख होता. गेल्या सात वर्षांपासून पथक त्याचा शोध घेत होते. अनेकदा पथक आरोपीच्या शोधासाठी पश्चिम बंगालमध्ये जाऊन आले. मात्र रेहमान त्यांच्या हाती लागला नाही. अखेर पुन्हा त्याचे पश्चिम बंगालमधील लोकेशन समजताच पथकाने सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याने बांग्लादेशमधून बनावट नोटा मिळवल्या होत्या. याच नोटा अटकेतील आरोपीकडे बाजारात वितरित करण्यासाठी दिल्या असल्याचे तपासात समोर आले.