आमदारांमधील राड्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून सरकारची कानउघडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 06:43 PM2022-08-24T18:43:15+5:302022-08-24T18:47:09+5:30

गुन्हेगारांवर जरब असणं गरजेचे आहे मात्र त्यासाठी मनगट मजबूत असण्याची गरज आहे. परंतु या सरकारमध्ये ती ताकद आहे का? असा सवाल विरोधी पक्षनेते दानवेंनी उपस्थित केला.

Leader of Opposition Ambadas Danve Target Shinde-Fadnavis government's over the row between the MLAs in vidhan bhavan | आमदारांमधील राड्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून सरकारची कानउघडणी

आमदारांमधील राड्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून सरकारची कानउघडणी

Next

मुंबई -  लोकशाहीच्या दृष्टीने विरोधी पक्षाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. परंतु एक आमदार खुलेआम आमच्यावर कुणी हात उचलला तर आम्हीच त्यांच्यावर हात उचलू असं विधान करतो. सत्तेचा एवढा माज? आंदोलन करण्याचा विरोधकांना अधिकार नाही का? गद्दार म्हटल्याचा राग. गद्दारी केलीच तर घाबरता कशाला. गद्दार कुणी म्हणत असेल तर विरोधी पक्षांवर दादागिरी करण्याचा प्रकार सकाळी घडलेला आहे. परंतु ही दादागिरी महाराष्ट्र सहन करणार नाही. अशी दादागिरी करणारे अनेक पाहिले आहेत. राज्यातील जनतेने त्यांचे काय करायचे ते केलेले आहे अशा शब्दात विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सरकारची कानउघडणी केली.  

विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर दानवे बोलत होते. ते म्हणाले की, सरकार ज्याठिकाणी चुकत असेल त्याठिकाणी बोलण्याचा अधिकार विरोधकांना आहे. आत्ताचं सरकार येऊन फार दिवस झाले नाही. परंतु ५०-६० दिवसांचा हा कालावधी आहे. या कालावधीचा आढावा घेतला तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा बाजा वाजला आहे हे लक्षात येईल. हा बोजवारा उडताना ज्याप्रकारचे गुन्हे असताना त्यातील एकही गुन्हा घडलेलाच नाही असं दिसतं. राज्यात कायदा सुव्यवस्था खरेच आहे का? असा प्रश्न निर्माण होतो असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी म्हणतो, ईडीची धाड कोणावर पडणार आहे. मोहित कंबोजची चौकशी करणार आहात का? एखादा तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्याने हे म्हटलं तर समजू शकतो. परंतु मोहित कंबोज हा भाजपा पदाधिकारी असं जाहीर विधान करतो. मुंबईतले एक आमदार म्हणतात, जर कुणी दादागिरी केली तर त्याची तंगडी तोडू, कोथळा काढू, हे बोलणाऱ्याला सरकार सुरक्षा देते. ज्याने धमकी दिली त्याला सुरक्षा सरकार देते. एक आमदार अधिकाऱ्यांना धमकी देतात. मारहाण करतात. महाराष्ट्रात गुंडाराज सुरू आहे का? असा सवाल दानवेंनी उपस्थित केला. 

तसेच गुन्हेगारांना कायद्याची भीती उरली नाही असं राज्यात दिसून येते. छत्रपतींच्या महाराष्ट्रात आपण राहतो. बलात्कारातील आरोपींना काय शिक्षा दिली हे पाहिले आहे. गुन्हेगारांवर जरब असणं गरजेचे आहे मात्र त्यासाठी मनगट मजबूत असण्याची गरज आहे. परंतु या सरकारमध्ये ती ताकद आहे का? राज्यात घरफोडी, झुगार अड्डे, अपहरणाचे गुन्हे पाहिले तर यादी खूप मोठी आहे असं ते म्हणाले. 

दरम्यान, आमदारांविरोधात धडधडीत पुरावे, व्हिडिओ आहेत. सगळीकडे बातम्या आल्यात पण सरकार म्हणतं तपासून बघू. व्हिडिओ, ऑडिओ असताना काय तपासणार? पुण्यात काही शिवसैनिकांवर दहा-बारा कलमं लावली आहेत. एका वाहनावर दगडफेक झाली होती. ज्याने फेकले त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे. कोर्टाने या शिवसैनिकांना कुठलाही गुन्हा सिद्ध न झाल्यानं कलम ३०७, ३५३ लागू होत नाही असं सांगितले. पकडलेल्यांपैकी एकाही व्यक्तीचा घटनेत सहभाग नव्हता. यातील बबन थोरात जे जिल्हासंपर्क प्रमुख नांदेडचे आहेत. हे घटनास्थळी नव्हते. तरीही गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न केला. एकीकडे पुरावे असताना गुन्हे दाखल होत नाहीत दुसरीकडे खोटे गुन्हे दाखल करून मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न सरकार करतंय असं विरोधी पक्षनेते दानवेंनी म्हटलं. 
 

Web Title: Leader of Opposition Ambadas Danve Target Shinde-Fadnavis government's over the row between the MLAs in vidhan bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.