राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावरून आता रणकंदन; फडणवीसांनी दिले मलिकांनी केलेल्या आरोपांना उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 07:39 AM2021-11-11T07:39:19+5:302021-11-11T07:40:48+5:30

देवेंद्र फडणवीस यांनी दिले नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना उत्तर

Leader of Opposition Devendra Fadnavis has responded to the allegations made by Minister Nawab Malik | राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावरून आता रणकंदन; फडणवीसांनी दिले मलिकांनी केलेल्या आरोपांना उत्तर

राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावरून आता रणकंदन; फडणवीसांनी दिले मलिकांनी केलेल्या आरोपांना उत्तर

Next

मुंबई : अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांची फटाकेबाजी दिवाळीनंतरही सुरूच आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले, असा आरोप मलिक यांनी बुधवारी केला. तर त्यावर फडणवीस यांनी ‘एखाद्यासोबत चिखलात पडून नादी लागू नये. तुमच्या अंगाला 
घाण लागते आणि समोरच्याला मात्र घाणीत खेळायला आवडते,’ अशा शब्दांत उत्तर दिले. 

एखाद्यासोबत चिखलात खेळू नये

प्रख्यात नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे एक वाक्य ट्विट करून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांची खिल्ली उडविली. या आरोपांना फारसे महत्त्व देण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.‘मी फार पूर्वीच शिकलो की, एखाद्यासोबत चिखलात पडून नादी लागू नये. तुमच्या अंगाला घाण लागते आणि त्याला मात्र घाणीत खेळायला आवडते’ हा जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या वाक्याचा आशय फडणवीस यांनी ट्विट केला. 

मलिक यांनी आरोपांची घाण उडविली असली तरी आपण त्याला उत्तर देणार नाही, असे फडणवीस यांनी सूचित केले. नागपुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी, मलिक यांच्या आरोपांना आशिष शेलार यांनी समर्पक उत्तर दिलेले आहे, त्यापेक्षा जास्त महत्त्व या आरोपांना देण्याची गरज नाही, असेे ते म्हणाले.

Web Title: Leader of Opposition Devendra Fadnavis has responded to the allegations made by Minister Nawab Malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.