नेत्यांनो, कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहा
By admin | Published: May 22, 2015 12:39 AM2015-05-22T00:39:43+5:302015-05-22T00:39:43+5:30
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपयश आले असले तरी आजही सामान्य माणूस काँग्रेसच्या बाजूने उभा राहण्याच्या मन:स्थितीत आहे.
डिप्पी वांकाणी - मुंबई
इसिस संघटनेत सामील होण्यासाठी अरीब माजिदने इराकपर्यंत केलेला प्रवास, यासाठी त्याला कशी आणि कोणी मदत केली, याचा इत्थंभूत तपशील ढीगभर पुराव्यासह देत राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) माजिदविरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
आरोपपत्रातील तपशीलानुसार कल्याणच्या चौघांनी थॉमस कूकच्या विदेश सहल पॅकेजने तुर्कीला जाण्याचे ठरविले होते; ही प्रक्रिया अत्यंत कटकटीची आणि त्रासदायक असल्याचे कळल्यानंतर त्यांनी बेत बदलला. इराकला यात्रेकरू म्हणून जाण्यासाठी फक्त व्हिसाची गरज लागणार होती, म्हणून त्यांनी हा पर्याय निवडला. या प्रवासासाठी कुवैतच्या एक व्यक्तीने वेस्टर्न युनियन मनी ट्रान्सफरमार्फत १००० अमेरिकन डॉलरची सोयी करून ठेवली होती. तत्पूर्वी, आदीस डोलारीसने रहमनान दौलती आणि माजिदची भेट घडवून आणली. तथापि, प्रवास खर्चाची सोय अब्दुल्ला हादी अब्दुल्ला रेहमान अलेन्झीने केली.
हाती शस्त्रे घेऊन हे चौघे थेट इसिसच्या बाजूने युद्धात उतरण्यास आग्रही होते. अबू फातमी याने सोशल नेटवर्कच्या माध्यमातून त्यांना इसिसमध्ये सामील होण्यास भरीस पाडले. एवढेच नव्हे तर, या इसिसच्या लढ्यासाठी शस्त्रास्त्राच्या प्रशिक्षणासाठी अबू फातमी त्यांची शिफारस केली होती, असे या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. इसिस या दहशतवादी संघटनेत सामील होणे, संघटनेच्या दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग घेणे आणि भारताच्या मित्र राष्ट्रांविरोधात युद्ध पुकारणे, असे गंभीर आरोप अरिब माजिद याच्यावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ठेवले आहेत. बुधवारी एनआयएने अरीबविरुद्ध साडेआठ हजार पानी आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले.
एनआयएने सात खंडात तयार केलेल्या आरोपपत्रात अरीब ईसीसकडे कसा आकृष्ट झाला, त्याच्यात जिहादी विचार कसे व कुठे भिनवण्यात आले, त्याने अन्य तीन मित्रांसोबत ईसीसच्या तथाकथित लढाईत सहभागी होण्यासाठी भारतातून कसे पलायन केले, परदेशात कुठे वास्तव्य केले, त्याला तेथे कोणी व कसे सहकार्य केले याचा समावेश आहे. प्रशिक्षण शिबिरात तो कसा पोचला, प्रत्यक्ष लढाईत कसा सहभागी झाला, लढाई दरम्यान त्याला झालेली दुखापत, तो कसा परतला हा सर्व घटनाक्रम देखील आरोपपत्रात नमूद आहे.
च्माजिदच्या प्रवासाठी कुवैतच्या एक व्यक्तीने वेस्टर्न युनियन मनी ट्रान्सफरमार्फत १००० अमेरिकन डॉलरची सोयी करून ठेवली होती. तत्पूर्वी, आदीस डोलारीसने रहमान दौलती आणि माजिदची भेट घडवून आणली. तथापि, प्रवास खर्चाची सोय अब्दुल्ला हादी अब्दुल्ला रेहमान अलेन्झीने केली.