Join us

वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये अग्रगण्य आयआयटी सहभागी होणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 6:55 PM

रँकिंगच्या निकष व नियमांमध्ये पारदर्शकता आणण्याची मागणी

 

मुंबई   : टाईम्स हायर एज्युकेशनमार्फत २०२० या शैक्षणिक वर्षात होणाऱ्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशातील अग्रगण्य आयआयटी सहभागी होणार नसल्याचे त्यांच्याकडून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये आयआयटी बॉम्बे , आयआयटी रुरकी , आयआयटी गुवाहाटी , आयआयटी खरगपूर , आयआयटी मद्रास , आयआयटी दिल्ली, आयआयटी कानपुर यांचा समावेश असून आयआयटी बॉम्बे प्रशासनाकडून याची माहिती देण्यात आली आहे. संस्थेकडून रँकिंगसाठी आवश्यक पॅरामीटर्स व पारदर्शकता यांच्याबद्दल पुरेशी माहिती देण्यात संस्था असमर्थ ठरल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील शैक्षणिक वर्षात ते यासंदर्भात यशस्वी झाले तर पुढील निर्णय घेण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे.आयआयटी बॉम्बे ,आयआयटी मद्रास , आयआयटी दिल्ली याना डावलून अनेक नवीन संस्थाना अधिक चांगले गुण आणि रँकिंग देण्याचा प्रकार घडला आहे . शिवाय काही संस्थांकडून माहिती न देताही त्यांना रँकिंगमध्ये समाविष्ट करण्यात आले असल्याची घटना घडली आहे.  या सगळ्या पार्श्वभूमीवर टाईम्स हायर एज्युकेशन संस्थेने सगळ्यात आधी रँकिंगचे , गुण पद्धतीचे पॅरामीटर्स , नियम जाहीर करावेत, त्यात पारदर्शकता आणावी , त्यासंदर्भात आयआयटीना हे सगळे नियम पटवून देण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी आयआयटीकडून करण्यात आली आहे.क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटीने जाहीर केलेली रँकिंग ही अधिकृत आणि प्रतिष्ठित मानली जाणारी संस्था आहे.  यामध्ये दरवर्षी जगभरातील २ हजाराहून अधिक युनिव्हर्सिटीकडून त्यांचा डेटा मागविला जातो आणि त्या आधारे त्यांचे रँकिंग जाहीर केले जाते. यामध्ये तेथे शिकणारी विद्यार्थी संख्या, फॅकल्टी, शैक्षणिक दर्जा, तेथून विद्यार्थ्यांना मिळणारी प्लेसमेंट्स अशा विविध निकषांचा आधार घेतला जातो.

टॅग्स :आयआयटी मुंबईशिक्षणशिक्षण क्षेत्र