मुंबई : मागील दोन वर्षांत नसबंदी शस्त्रक्रियांचे प्रमाण कमी झाले आहे, पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नसंबदी शस्त्रक्रिया करण्यात महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण नगण्य असल्याचे दिसून आले आहे. २०१९ आणि २०२० या दोन वर्षांमध्ये १७ हजार ६५९ महिलांनी, तर ११६ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केल्या आहेत. २०१५ ते २०२० या पाच वर्षांच्या कालावधीत ९७ हजार ६६८ महिलांनी नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेतल्या असून, आतापर्यंत त्यातील फक्त ४५ महिलांची नसबंदीची शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर, नसबंदीच्या या उपक्रमात पुरुषांपेक्षा महिलांनी जास्त पुढाकार घेतला असून फक्त २ हजार ७४० पुरुषांनी नसबंदी करून घेतली आहे. तर, यापैकी एकाही पुरुषाच्या नसबंदीची शस्त्रक्रिया अयशस्वी झालेली नसल्याचे पालिकेने सांगितले.पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले, मागील दोन वर्षांत नसबंदी शस्त्रक्रिया कमी झाल्या आहेत. याविषयी जनजागृती करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोनानंतर आता संपूर्णतः रुग्णाची काळजी घेऊन या शस्त्रक्रिया नियमित होण्यासाठीही पालिकेच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत, नसबंदीची इच्छा असणाऱ्यांनी पालिकेच्या रुग्णालयात जाऊन करून घ्यावी, तिथे त्यांना मार्गदर्शन केले जाईल. आकडेवारीवर्ष महिला पुरुष एकूण नसबंदी२०१५/१६ १९२५४ ८०० २००५४२०१६/१७ २०७४२ ७२९ २१४६७२०१७/१८ २०७५० ९१४ २१६६४२०१८/१९ १९२६३ १८५ १९४४८महिलांच्या अयशस्वी झालेल्या शस्त्रक्रिया२०१५ -१६ ११२०१६-१७ ०८ २०१७-१८ ११२०१८-१९ ११
नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात महिला आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 2:16 AM