मुंबई- दहिसर पूर्वेकडील टोल नाक्याजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गावर ३०० मिमी पाण्याच्या जलवाहिनीला गळती लागली आहे. ५ डिसेंबर रोजी १२ वाजता महामार्गावर अदानी इलेक्ट्रिसिटीचे दुरुस्तीचे काम सुरू असताना जलवाहिनीला धक्का लागल्याने ही गळती लागल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान जलाभियंता विभागाकडून सुरू असून दुपारी ४ वाजेपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दहिसर येथे ३०० मिमी पाण्याच्या जलवाहिनीला गळती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2023 1:56 PM