घरूनच काढतात लर्निंग लायसन्स, लाभ घेणाऱ्यांच्या संख्येमध्ये होत आहे वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 02:38 PM2023-09-16T14:38:11+5:302023-09-16T14:38:32+5:30

Mumbai: आधार क्रमांकाचा वापर करून ‘फेसलेस पद्धतीने’ घरबसल्या लर्निंग लायसन्स काढणे अधिक सोपे झाले आहे. याचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दरम्यानच्या काळात दलालांची मदत घेत काहीजण ‘डमी’ उमेदवाराना बसून या लायसन्साठी आवश्यक असलेली संगणक परीक्षा देत होते. 

Learner's license taken from home, increasing number of beneficiaries | घरूनच काढतात लर्निंग लायसन्स, लाभ घेणाऱ्यांच्या संख्येमध्ये होत आहे वाढ

घरूनच काढतात लर्निंग लायसन्स, लाभ घेणाऱ्यांच्या संख्येमध्ये होत आहे वाढ

googlenewsNext

मुंबई - आधार क्रमांकाचा वापर करून ‘फेसलेस पद्धतीने’ घरबसल्या लर्निंग लायसन्स काढणे अधिक सोपे झाले आहे. याचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दरम्यानच्या काळात दलालांची मदत घेत काहीजण ‘डमी’ उमेदवाराना बसून या लायसन्साठी आवश्यक असलेली संगणक परीक्षा देत होते. 
याच्या तक्रारी वाढल्याने वेबकॅम सुरू ठेवूनच लर्निंग लायसन्सची परीक्षा देण्याची सक्ती करण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, चार आरटीओ कार्यालये मिळून ८९ हजार लर्निंग लायसन्स काढण्यात आले आहेत. 

मुंबईत प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत (आरटीओ) १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ८९ हजार लर्निंग लायसन्स ऑनलाइन काढण्यात आले. 

ऑनलाइन परीक्षेत नापास किती होतात?
मागील आठ महिन्यांत ऑनलाइन लर्निंग लायसन्ससाठी ८९ हजार  प्रतिनिधींनी परीक्षा दिली यामध्ये १६५६ नापास झाले. पास होण्याचा दर जवळपास ९८ टक्के आहे.

असा करा अर्ज 
   ‘फेसलेस’ सेवेचा लाभ घेणाऱ्यांकडे आधारकार्ड आणि त्या आधारकार्डशी मोबाइल नंबर जोडलेला असणे आवश्यक आहे.
  परिवहन डॉट जीओव्ही डॉट इनवर जाऊन लायसन्ससाठी अर्ज करता येतो. 
 आधार क्रमांकामधील मोबाइलवर ‘ओटीपी’ पाठविला जातो, त्यानंतर पुढील प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे डाउनलोड करून व ऑनलाइन शुल्क भरल्यावर परीक्षा देता येते. 

वेब कॅमेरा असेल, तरच देता येते ऑनलाइन परीक्षा
ऑनलाइन लर्निंग लायसन्सची परीक्षा संगणकाला किंवा लॅपटॉपला वेब कॅमेरा असेल तरच देता येते. या ‘वेब कॅमेऱ्या’चा प्रॉक्टरिंग प्रोसेसमध्ये असते. यात उमेदवाराने इकडे-तिकडे पाहिल्यास, डमी उमेदवार बसविल्यास आणि इतरही संशयित हालचाल झाल्यास त्याची नोंद प्रॉक्टरिंग प्रोसेसमध्ये होऊन उमेदवार बाद होऊ शकतो.

Web Title: Learner's license taken from home, increasing number of beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.