Join us

किमान या तपासात दिरंगाई नको : गृहमंत्री अनिल देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:07 AM

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटीन असलेली संशयित कार सापडल्या प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने एनआयएकडे दिला ...

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटीन असलेली संशयित कार सापडल्या प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने एनआयएकडे दिला आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास चांगल्या पद्धतीने करत होते, असे सांगतानाच या तपासात दिरंगाई होऊ नये, अशी अपेक्षा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली.

एनआयएकडे तपास वर्ग केल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी माध्यमांना सांगितले की, काही दिवसांपूर्वी अभिनेता सुशांतसिंह मृत्यूचा तपासही अशाच पद्धतीने सीबीआयने घेतला होता. याचे पुढे काय झाले, सुशांतसिंहची आत्महत्या होती की हत्या याचा तपास अजून लागलेला नाही. पण, या तपासात दिंरगाई होऊ नये अशी आशा आहे. स्फोटकांचा तपास एनआयएकडे गेला असला तरी मनसुख हिरेन यांच्या आत्महत्येचा तपास राज्य एटीएस करत राहील, असेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

.................................