मुंबई : अश्लील अवस्थेतील फोटोमध्ये २६ वर्षीय विवाहितेचा फोटो लावून, तेच फोटो तिला पाठवून नोकरी सोडली नाहीस, तर हेच फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिल्याची घटना कफपरेड येथे उघडकीस आली. या प्रकरणी कफपरेड पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.कफपरेड परिसरात २६ वर्षीय विवाहिता कुटुंबीयांसोबत राहते. ती एका बड्या कंपनीत नोकरीला आहे. ५ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास तिच्या मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरून फोटो आले. ते फोटो पाहून विवाहितेला धक्का बसला. अश्लील अवस्थेतील फोटोवर महिलेचा फोटो लावण्यात आला होता. त्याखाली कंपनीतील नोकरी सोडली नाही, तर हेच फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. तिने कुटुंबीयांच्या मदतीने थेट कफपरेड पोलीस ठाणे गाठले. विवाहितेच्या तक्रारीवरून कफपरेड पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध विनयभंग, धमकावणे आणि आयटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही.
नोकरी सोडावी, म्हणून पाठविले अश्लील फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 5:31 AM