महत्वाच्या कामासाठीच उद्या घराबाहेर पडा; मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 12:34 PM2023-02-11T12:34:12+5:302023-02-11T12:35:10+5:30
प. रेल्वेवर मात्र मेगाब्लॉक असणार नाही.
मुंबई: नातलगांच्या घरी जाण्यासाठी किवा एखाद्या कार्यक्रमासाठी कुटुंब कबिल्यासह मुंबईकर रविवारी बाहेर पडतात. परंतु, उद्या रविवारी काही महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा. कारण, उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. प. रेल्वेवर मात्र मेगाब्लॉक असणार नाही.
हार्बर रेल्वे -
कुठे : पनवेल ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर
कधी : सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत
परिणाम -
१. ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी मुंबई येथून पनवेल,बेलापूर करीता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
२. पनवेल येथून ठाण्याकडे जाणाऱ्या अप- डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. या ब्लॉक कालावधीत बेलापूर आणि खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील.
मध्य रेल्वे -
कुठे : विद्याविहार आणि ठाणे अप आणि डाऊन पाचवी सहावी मार्गिकेवर
कधी : सकाळी ११ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत
परिणाम : या ब्लॉकदरम्यान एलटीटी येथे येणाऱ्या मेल,एक्स्प्रेस गाड्या कल्याण ते ठाणे दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. बनारस-एलटीटी सुपरफास्ट एक्स्प्रेस, पाटलीपुत्र-एलटीटी एक्सप्रेस, कोईम्बतूर- एलटीटी एक्सप्रेस, प्रयागराज-एलटीटी दुरंतो एक्सप्रेस, गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस, छाप्रा-एलटीटी एक्सप्रेस, चेन्नई-एलटीटी एक्स्प्रेस, आग्रा कॅँटॉमेंट-एलटीटी लष्कर एक्स्प्रेस एलटीटी येथून सुटणाऱ्या डाऊन मेल, एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील व १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.