Join us

विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी आज भूखंड सोडत

By admin | Published: February 28, 2015 1:46 AM

प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीसंदर्भात सिडकोच्या वतीने पुनर्वसन व पुन:स्थापना योजना राबविण्यात येत आहे.

नवी मुंबई : प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीसंदर्भात सिडकोच्या वतीने पुनर्वसन व पुन:स्थापना योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या भूखंडांची संगणकीय सोडत उद्या सकाळी ११ वाजता काढण्यात येणार आहे. निवृत्त न्यायाधीश सुभाष धर्माधिकारी, माजी आय.ए.एस.अधिकारी व्ही.एस.धोंगड े, महावितरणचे महाव्यवस्थापक आर.आर.भालेकर आदींच्या उपस्थितीत ही सोडत होणार आहे. त्यामुळे विमानतळ प्रकल्पांसाठी दिलेल्या जमीन मालकांना यामध्ये लाभ मिळेल. (प्रतिनिधी)