ओबीसी आरक्षणाशिवायच अखेर होणार मनपा सोडत, असा आहे कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 12:11 PM2022-05-24T12:11:45+5:302022-05-24T12:12:13+5:30
निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई:राष्ट्रवादी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रलंबित राहिलेल्या मुंबईसह राज्यातील १४ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणूकीचा आरक्षण सोडतीला आता मुहूर्त मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम निश्चित केला असून येत्या ३१ मे रोजी महिलेसाठीच्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व सर्वसाधारण या प्रवर्गातील आरक्षण सोडत काढली जाणार आहे. ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या विशेष अनुमती याचिकेबाबत ४ मे रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकाची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याबाबत कार्यक्रम दिला होता त्याला शासन राज्य पत्रात प्रसिद्धी करण्यात आली आहे.
जोपर्यंत राज्य सरकार त्रीस्तरीय चाचणी पूर्ण करीत नाही ,तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग करिता जागा जागा राखून ठेवता येणार नाहीत त्यामुळे महापालिकेची प्रभाग रचना पूर्ण झाली असून आता कायद्यातील तरतुदीनुसार तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशातील निर्णयानुसार आयोगाने अन्य आरक्षणाचा कार्यक्रम निश्चित केला आहे.
मुंबईसह सर्व १४ महापालिकांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना दोन्ही काँग्रेस आणि विरोधक भाजपा प्रयत्नांची पराकाष्टा करणार आहे.
या मनपात आरक्षण सोडत
मुंबई, नवी मुंबई ,वसई_ विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती अकोला व नागपूर
असा आहे कार्यक्रम
nअनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) नोटीस प्रसिद्ध करणे - २७ मे २०२२ सोडत काढणे - ३१ मे २०२२
प्रभाग निहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करणे
१ जून२०२२
हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी
१ ते ६ जून २०२२
अंतिम आरक्षण सोडत
१३ जून २०२२