‘विज्ञानाचा विकास’ विषयावर व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:06 AM2021-04-14T04:06:17+5:302021-04-14T04:06:17+5:30
‘विज्ञानाचा विकास’ विषयावर व्याख्यान मुंबई : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगा या ...
‘विज्ञानाचा विकास’ विषयावर व्याख्यान
मुंबई : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगा या व्याख्यानमालेत विज्ञानाचा विकास या विषयावर टाटा मूलभूत संशोधन संसंस्थेचे निवृत्त शास्त्रज्ञ प्रा.डॉ. मयांक वाहिया यांचे व्याख्यान इंग्रजीतून होईल. १६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता लाइव्ह होणारे हे व्याख्यान सर्वांसाठी विनामूल्य आहे.
............................
स्पर्धेतील शेतीसाठीचे पुरस्कार जाहीर
मुंबई : मराठी विज्ञान परिषदेने घेतलेल्या स्पर्धेत अमरावतीचे प्रा. प्रतीक किशोर देशमुख यांना शंख किडीच्या निर्मूलनासाठी योजलेल्या उपायासाठी वसंतराव नाईक पुरस्कार तर चिपळूणच्या दिशांतर संस्थेला महिलांच्या नेतृत्वाखाली केलेल्या शेतीबद्दल बळीराजा-अण्णासाहेब शिंदे पुरस्कार जाहीर झाला. प्रोत्साहनपर मराठी विज्ञान परिषद-ज्योती चापके पुरस्कार औरंगाबादचे राजेंद्र आत्माराम नलावडे यांना पर्यावरणस्नेही शेतीसाठी जाहीर झाला. हे पुरस्कार २५ एप्रिलला दिले जातील.
.............................