लीला दळवी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 05:01 AM2021-03-11T05:01:39+5:302021-03-11T05:02:05+5:30

राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारातून घडलेल्या लीलाताई यांनी पूर्णवेळ सामाजिक कार्यात झोकून देणाऱ्या पतीला मोलाची साथ दिली. बाबा दळवी यांच्या निधनानंतर त्या मुंबईत प्रशांत दळवी यांच्याकडे होत्या

Leela Dalvi passes away | लीला दळवी यांचे निधन

लीला दळवी यांचे निधन

Next
ठळक मुद्देराष्ट्र सेवा दलाच्या संस्कारातून घडलेल्या लीलाताई यांनी पूर्णवेळ सामाजिक कार्यात झोकून देणाऱ्या पतीला मोलाची साथ दिली. बाबा दळवी यांच्या निधनानंतर त्या मुंबईत प्रशांत दळवी यांच्याकडे होत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : श्रीमती लीला मधुकर दळवी (९५) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी दुपारी मुंबईत निधन झाले. ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते समाजवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते दिवंगत म. य. उर्फ बाबा दळवी यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात, नाट्य लेखक अजित दळवी आणि प्रशांत दळवी ही दोन मुले, अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, अनुया दळवी या दोन सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. 

राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारातून घडलेल्या लीलाताई यांनी पूर्णवेळ सामाजिक कार्यात झोकून देणाऱ्या पतीला मोलाची साथ दिली. बाबा दळवी यांच्या निधनानंतर त्या मुंबईत प्रशांत दळवी यांच्याकडे होत्या. आईंच्या जाण्याने बाबांच्या ऋणानुबंधातील आणखी एक धागा निसटून गेला, अशा शब्दांत लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी भावना व्यक्त केल्या. बाबा दळवी हे लोकमत परिवारातील ज्येष्ठ सदस्य होते. औरंगाबादेत सुरुवातीच्या काळात लोकमतला सामान्य माणसापर्यंत नेण्यासाठी बाबांनी अपार मेहनत घेतली. अठरापगड जातीच्या लोकांना लोकमत आपला वाटावा यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट आजही लोकमत परिवाराच्या  स्मरणात आहेत. बाबा आणि आई कॅम्पसमध्येच राहत असत. लोकमतमध्ये सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन कशा पद्धतीने वार्तांकन करावे यासाठी बाबांनी वार्ताहरांची मोठी फळी तयार केली, त्यासाठी बाबा सतत बाहेर असायचे आणि आई शांतपणे घर सांभाळत असायच्या. त्यांचा लोकमत परिसरातील शांत वावर मला आजही आठवत राहतो, असेही राजेंद्र दर्डा म्हणाले.

Web Title: Leela Dalvi passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई