Join us

केईएममध्ये शॉर्टसर्किटमध्ये भाजलेल्या चिमुकल्याला गमवावा लागला डावा हात 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 4:42 PM

त्याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहितीही त्यांनी दिली.

ठळक मुद्देमंगळवारी प्रिन्सच्या काही वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या होत्या.हि आग कुठल्याही यंत्रामुळे नसून वायर्समुळे शॉर्टसर्किट लागली होती. हे बाळ वाराणसी येथून घटनेच्या काही दिवसांपूर्वी केईएम रुग्णालयातील बाल अतिदक्षता विभागात दाखल झाले आहे.

मुंबई - केईएम रुग्णालयात ईसीजी यंत्रणेत झालेल्या शॉर्टसर्किटमध्ये भाजलेल्या चार महिन्यांच्या प्रिन्सचा डावा हात सोमवारी काढण्यात आला. त्यानंतर मंगळवारी प्रिन्सच्या हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवण्यासाठी औषधोपचार करण्यात येत असल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली. मंगळवारी प्रिन्सच्या काही वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यांचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर हिमोग्लोबीन ९.३ म्हणजेच कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याप्रमाणे, त्याला काही प्रमाणात रक्त चढविण्यात आल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. त्याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहितीही त्यांनी दिली.केईएम रुग्णालयात गेल्या बुधवारी रात्री बाल अतिदक्षता विभागात ईसीजी यंत्रामध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे दोन महिन्याचे बाळ जखमी झाले आहे, अशी माहिती केईएम रुग्णालय प्रशासनाने दिली. या घटनेत दोन महिन्याचे बाळ जखमी झाले असून १५ ते २० टक्के भाजल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली होती. या घटनेविषयी अधिक माहिती देताना डॉ. देशमुख म्हणाले की, गुरुवारी रात्री बालअतिदक्षता विभागात ही घटना घडली. ईसीजी यंत्रांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली, त्यात गादीने पेट घेतला.

हि आग कुठल्याही यंत्रामुळे नसून वायर्समुळे शॉर्टसर्किट लागली होती. यामुळे तेथील दोन महिन्याच्या बाळाच्या डाव्या हाताला आणि डोक्याच्या काही भागाला भाजले आहे. याचे प्रमाण १५ ते २० टक्के आहे. त्या बाळाची प्रकृती आता स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. हे बाळ वाराणसी येथून घटनेच्या काही दिवसांपूर्वी केईएम रुग्णालयातील बाल अतिदक्षता विभागात दाखल झाले आहे. या बाळाला छातीत संसर्ग झाला असून त्याला श्वासोच्छवास करण्यास त्रास होत असल्याच्या समस्येवर उपचार सुरु आहेत.

टॅग्स :केईएम रुग्णालयमुंबईहॉस्पिटल