डावखरे, केळकर, चव्हाण कजर्बाजारी कोटय़ाधीश

By admin | Published: September 30, 2014 11:33 PM2014-09-30T23:33:02+5:302014-09-30T23:33:02+5:30

राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे, मनसेचे निलेश चव्हाण आणि भाजपाचे संजय केळकर हे तिन्ही उमेदवार कोटय़धीश असून त्यांच्यावर एकही गुन्हा नसल्याचे त्यांनी आपल्या शपथपत्रत म्हटले आह़े

Lefthearted, Kelkar, Chavan, Kajarbari Kotayadadhyad | डावखरे, केळकर, चव्हाण कजर्बाजारी कोटय़ाधीश

डावखरे, केळकर, चव्हाण कजर्बाजारी कोटय़ाधीश

Next
>ठाणो : ठाणो शहर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे, मनसेचे निलेश चव्हाण आणि भाजपाचे संजय केळकर हे तिन्ही उमेदवार कोटय़धीश असून त्यांच्यावर एकही गुन्हा नसल्याचे त्यांनी आपल्या शपथपत्रत म्हटले आह़े
 कोटय़धीश केळकरांवर 
वाहनाचे कजर्
ठाणो शहर मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय केळकर कोटय़धीश असले तरी त्यांच्यावर वाहन कर्ज आहे. तसेच त्यांच्यावर दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा होईल, असा एकही गुन्हा दाखल नसल्याची माहिती त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रत म्हटले आहे. 
केळकर स्वत: कर सल्लागार असून त्यांचे 2क्13-14 या वर्षाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 19 हजार 556 रुपये आहे. तसेच त्यांची प}ी कमल बँकेत नोकरीला असून त्यांचे (2क्13-14) वार्षिक उत्पन्न 7 लाख 14 हजार 814 रुपये आहे. तसेच केळकरांकडे 5क् हजारांची तर त्यांच्या प}ीकडे 3क् हजार आणि मुलाकडे काही रोकड नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्याकडे 11 लाख 71 हजारांची गाडी असून 1 लाख 5क् हजारांचे 5 तोळे सोन्याचे दागिने आणि बँक ठेवी आणि शेअर्स अशी एकूण 17 लाख 75 हजार 523.2क् रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्या प}ीकडे 7 लाख 5क् हजारांचे 25 तोळे सोन्याचे दागिने आणि बँक ठेवी व शेअर्स, राष्ट्रीय बचन योजना असे एकूण 9 लाख 42 हजार 733 रुपयांची मालमत्ता आहे. तसेच केळकर यांच्यासह त्यांच्या कु टुंबीयांच्या नावे कुठेही जमीन नाही. मात्र, त्यांच्या स्थावर मालमत्तेचे बाजारमूल्य 1 कोटी 29 लाख रुपये असून त्यांच्या प}ीच्या नावे 5क् लाखांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्यावर 6 लाख 56 हजारांचे तर प}ी कमल यांच्या नावे 27 लाख 54 हजारांचे गृहकर्ज असल्याचे म्हटले आहे. 
चव्हाण कोटय़धीश असूनही 
लाखोंचे कजर्बाजारी
ठाणो शहर मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निलेश चव्हाण हे कोटय़धीश असून त्यांच्यावर 13 लाख 49 हजार 693 रुपयांचे कर्ज आहे. तसेच दोन वर्षापेक्षा अधिक शिक्षा होईल, असा त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. तसेच त्यांची प}ीही लखपती असून दोन्ही मुलांच्या नावे रोकड व जमीन नसल्याचे त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रत म्हटले आहे. 
सिव्हील इंजिनीअरिंगचा डिप्लोमा केलेल्या चव्हाण यांनी व्यवसाय धंदा म्हटले असले तरी त्यांनी तो नक्की कोणता आहे, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. त्यांचे  2क्12-13 या वर्षाचे वार्षिक उत्पन्न 4 लाख 33 हजार 68क् रुपये दाखविले असून त्यांची प}ी पूनम गृहिणी असल्याने त्यांचे उत्पन्न काहीच दाखविले नाही.  चव्हाणांकडे 2 लाख 34 हजार 68क् रुपयांची तर प}ीकडे 52 हजार 78क् रुपयांची रोकड आहे. तसेच त्यांच्याकडे 4 लाख 43 हजार 354 रुपयांची गाडी आणि 4 लाख 76 हजार 28क् रुपयांचे दागिने आहेत. मात्र, त्यांच्या प}ीकडे गाडी नसली तरी 6 लाख 4क् हजारांचे सोन्याचे दागिने आहेत. बँक ठेवींबरोबर शेअर्स आणि राष्ट्रीय बचत योजना आदी असे 44 लाख 61 हजार 761 रुपये त्यांच्याकडे तर त्यांच्या प}ीकडे  रोकड, बँक ठेवी, शेअर्स आणि राष्ट्रीय बचत योजना आदी असे 8 लाख 51 हजार 78क् रुपये दाखविण्यात आले आहेत. चव्हाण यांच्या नावे चिपळूण येथे जमीन असून स्थावर मालमत्ता 4 कोटी 6 लाख 9क् हजार रुपये दाखविले आहेत. त्यांनी 13 लाख 49 हजार 693 रुपयांचे कर्ज त्यांनी घेतले आहे. मात्र, प}ी आणि मुलांच्या नावे कोणतीही जमीन किंवा स्थावर मालमत्ता नाही. शिवाय, कजर्ही  नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
 
निरंजन डावखरेही कोटींचे कजर्बाजारी
शहर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार निरंजन डावखरे हे कोटय़धीश असले तरी त्यांच्यावर कोटींचे कर्ज आहे. तसेच दोन वर्षापेक्षा अधिक शिक्षा होईल, असा कोणताही गुन्हा  त्यांच्यावर दाखल नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रत म्हटले आहे. 
 
मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतलेले डावखरे यांचे 2क्14-15 या वर्षाचे वार्षिक उत्पन्न 2क् लाख 85 हजार 232 रुपये असून प}ी नीलिमाच्या नावे 2 लाख 16 हजार 31क् रुपये उत्पन्न दाखविले आहे. डावखरे यांच्याकडे 1 लाख 81 हजार 45 रुपयांची रोकड असून त्यांची प}ीकडेही 2 लाख 15 हजार 2क्क् तर मुलगा मधुर यांच्याकडे  4 हजार 354 रुपयांची रोकड असल्याचे दाखविले आहे. त्यांनी विविध बँकांमधून 1 कोटी 78 लाख 2क् हजार 461 रुपयांचे तर त्यांच्या प}ीने 33 लाख 67 हजार 275 रुपयांचे कर्ज घेतल्याचे म्हटले आहे. 
 
डावखरे यांच्याकडे 7 लाख 75 हजार 5क्क् रुपयांचे सोन्याचे तर 1 लाख 19 हजार 66क् रुपयांचे चांदीचे दागिने असून प}ीकडे 16 लाख 44 हजारांचे सोन्याचे तर 1 लाख 11 हजारांचे चांदीचे दागिने आहेत. मुलगा मधुरकडे 3 लाख 6क् हजार 58क् रुपयांचे दागिने असल्याचे दाखविले आहे. त्यांची पुणो-ठाण्यात जमीन असून त्या जमिनीचे बाजारमूल्य 2 कोटी 6क् लाख 7 हजार 369 रुपये असून तसेच त्यांनी आपली स्थावर मालमत्ता 11 कोटी 88 लाख क्8 हजार 64 रुपये दाखविली आहे. 
 

Web Title: Lefthearted, Kelkar, Chavan, Kajarbari Kotayadadhyad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.