मुंबई : जैन समाजाच्या पर्यूषण महापर्वाच्या समारोपासह संवत्सरी पर्व आणि पाळणा महोत्सव बुधवारी ग्रँट मेडिकल महाविद्यालयाशेजारील रिचर्डसन अँड क्रूडास येथे पार पडला. पायधुनी येथील गोडीजी संघातील प.पू.राजशेखर सूरीश्वरजी महाराज यांच्या निष्ठामध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात सुमारे १५ हजार लोकांनी हजेरी लावली. राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांनी कार्यक्रमाला भेट दिली.या वेळी खिमराज जैन यांनी सांगितले की, ‘या पाळणा महोत्सवात सिद्धितपाची सांगता झाली.’ ‘या तपात १ दिवसापासून ४४ दिवसांच्या उपवास करण्याची पद्धत आहे. ५९५ भक्तांनी हा उपवास करावा, असा निश्चय संघाने केला होता. मात्र, ५७० लोकांनीच ४४ दिवसांचा उपवास केला. याउलट १०८ भक्तांनी सलग ३० दिवसांचा उपवास केला, तर १ हजार ५०० भक्तांनी सलग आठहून अधिक दिवस म्हणजेच ११, १५, १६, २१ आणि २५ दिवसांचे उपवास केले. उपवास करणारी व्यक्ती सकाळी १० पासून सूर्यास्तापर्यंत केवळ पाणी पिऊ शकते, सूर्यास्तानंतर जेवण किंवा पाणी काहीही घेता येत नाही. अशी ८ दिवसांपासून ४४ दिवस उपवास करण्याची परंपरा आहे,’ अशी माहिती राजरत्न विजयजी महाराज यांनी दिली. (प्रतिनिधी)
पर्यूषण महापर्वाची सांगता
By admin | Published: September 08, 2016 6:11 AM