Join us

टोल प्रश्नावरून प्रशांत ठाकूर यांची आमदारकी पणाला

By admin | Published: August 21, 2014 11:16 PM

पनवेल - सायन महामार्गावरील प्रस्तावित टोल नाक्याचा विषय आमदार प्रशांत ठाकूर यांनी अतिशय प्रतिष्ठेचा केला आहे.

प्रशांत शेडगे ल्ल पनवेल
पनवेल - सायन महामार्गावरील प्रस्तावित टोल नाक्याचा विषय आमदार प्रशांत ठाकूर यांनी अतिशय प्रतिष्ठेचा केला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षावर दबाव वाढत असून टोल रद्द न झाल्यास  आमदारकी सोडण्याचा इशारा प्रशांत ठाकूर यांनी खाजगीत दिला आहे. 
याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन करुन निर्णय घेण्याची घोषणा केली होती. मात्र त्याबाबत ठोस पावले उचलली जात नसल्याने आमदारांबरोबर त्यांचे समर्थकही आक्रमक झाले आहेत. टोल प्रश्नी नुसती टोलवाटोलवी नको, नाका रद्द करा किंवा स्थानिकांना सवलतीची घोषणा करा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. त्यामुळे शासनाला आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निर्णय घ्यावा लागणार आहे.  
आगामी निवडणुका लक्षात घेता, आमदार ठाकूर यांनी काँग्रेसवर दबाब वाढविण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसलाही तूर्तास रायगड जिल्हय़ात माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासारखा नेता मिळणो अवघड आहे. रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाला या परिसरात असलेले वलय ही काँग्रेससाठी मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळे टोलसारख्या संवेदनशील प्रश्नाची तड काँग्रेस नेतृत्त्व कशाप्रकारे लावते, यावर परिसरातील राजकीय गोष्टी अवलंबून आहे. 
मुंबई ते पुणो  महामार्ग बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वानुसार  दहा पदरी करण्यात आला असून 23 कि.मी. अंतरावर काही ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. दोन महिन्यापूर्वी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असला तरी अद्याप अनेक कामे बाकी राहिलेले आहेत. असे असताना फक्त टोल वसूल करण्याची घाई म्हणून काम पूर्ण झाल्याचा आव संबंधीत ठेकेदाराने आणला. खारघर टोलनाक्याला आमदार प्रशांत ठाकूर यांनी कडाडून विरोध दर्शवला. स्थानिकांना यामधून सूट देण्यासाठी त्यांनी  11 जुलै रोजी रास्ता रोका आंदोलनसुध्दा केले. टोलचा प्रश्न माजी खासदार रामशेठ ठाकूर, जिल्हाध्यक्ष आर.सी. घरत यांच्यासह सर्व नेत्यांनी प्रतिष्ठेचा केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांनीही याबाबत तोडगा काढण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. संबंधीत ठेकेदाराचा परतावा करुन हा महामार्ग टोल फ्री करण्याचा प्रस्तावही पुढे आला आहे. सिडको किंवा एमएमआरडीएने हा भार उचलण्याची मागणी कामगार नेते महेंद्र घरत यांनी केली होती.
 
वाशी टोल नाका 15 कि.मी. अंतरावर असताना खारघर येथे नियमाने पथकर वसूल करताच कसा येऊ शकतो असा सवाल माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासह पदाधिका:यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनीही हा टोल नाका चुकीचा असल्याची कबुली दिली. संबंधीत ठेकेदाराला त्याच्या पैशाचा परतावा करुन हा महामार्ग टोलमुक्त करण्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यानुसार या संदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली मात्र  तत्कालीन मुख्य सचिव सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागेवर दुसरे सचिव आले आहेत. एक महिना उलटून गेला तरी शासनाने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे काही प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे.