वैधानिक समित्यांमध्ये वाढली सेनेची ताकद, समान संख्याबळामुळे खडाजंगी थंडावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 04:39 AM2017-10-20T04:39:03+5:302017-10-20T04:40:24+5:30
मनसेचे सहा नगरसेवक फोडून शिवसेनेने सत्तेबरोबरच वैधानिक समित्यांमधील ताकदही वाढवली आहे. महापालिकेची आर्थिक नाडी, जमिनींच्या व्यवहाराचे निर्णय घेणाºया या महत्त्वाच्या समित्यांमध्ये शिवसेनेचे संख्याबळ एकने वाढले.
मुंबई : मनसेचे सहा नगरसेवक फोडून शिवसेनेने सत्तेबरोबरच वैधानिक समित्यांमधील ताकदही वाढवली आहे. महापालिकेची आर्थिक नाडी, जमिनींच्या व्यवहाराचे निर्णय घेणाºया या महत्त्वाच्या समित्यांमध्ये शिवसेनेचे संख्याबळ एकने वाढले. तर मनसेचे समित्यांमधील अस्तित्व संपल्यामुळे विरोधी पक्षांची ताकद आणखी कमी झाली आहे. परिणामी, समान संख्याबळामुळे याआधी समित्यांमध्ये रंगणारी खडाजंगी थंडावणार आहे.
पालिकेत सेनेची सत्ता काठावर असल्याने भाजपाकडून त्यांना कायम धोका होता. सेनेचे ८४, तर भाजपाचे ८२ संख्याबळ असल्याने प्रत्येक समित्यांमध्ये भाजपा शिवसेनेच्या बरोबरीनेच होती. पहारेकºयांच्या भूमिकेतील भाजपाकडून शिवसेनेची कोंडी केली जात होती. त्यात भांडुपच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय झाल्याने शिवसेनेची सत्ता अडचणीत आली. धास्तावलेल्या शिवसेनेच्या गोटात वेगाने चक्र फिरले आणि मनसेच्या सहा नगरसेवकांना आपल्या पक्षाकडे फिरवण्यात त्यांना यश आले. त्यामुळे सेनेचे संख्याबळ ९१ झाले आहे. भाजपाकडून पुढच्या हालचाली होईपर्यंत सेनेच्या सत्तेला धोका नाही. वैधानिक समित्यांमध्ये सेनेच्या मागे असलेला भाजपाचा ससेमीरा संपेल. तसेच अनेक प्रस्ताव त्यांना स्वबळावर मंजूर करता येतील.
असे आहे समित्यांवरील संख्याबळ
स्थायी समिती
एकूण सदस्य २७
शिवसेना १२
भाजपा १०
काँग्रेस ०३
राष्ट्रवादी ०१
समाजवादी ०१
शिक्षण समिती
एकूण सदस्य २२
बिगर सदस्य ०४
शिवसेना १२
भाजपा ०९
काँग्रेस ०४
राष्ट्रवादी ०१
सुधार समिती
एकूण सदस्य २६
शिवसेना ११
भाजपा १०
काँग्रेस ०३
राष्ट्रवादी ०१
समाजवादी ०१
बेस्ट समिती
एकूण सदस्य १६
शिवसेना ०८
भाजपा ०६
काँग्रेस ०२
राष्ट्रवादी ०१