फसवणूक करून कर्ज घेणारा अटकेत

By admin | Published: February 10, 2017 04:48 AM2017-02-10T04:48:37+5:302017-02-10T04:48:37+5:30

बनावट कागदपत्रांद्वारे गाडीसाठी कर्ज घेऊन बँकेची फसवणूक करणाऱ्या टोळीतील एकाला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे

The lender is detained by fraud | फसवणूक करून कर्ज घेणारा अटकेत

फसवणूक करून कर्ज घेणारा अटकेत

Next

नवी मुंबई : बनावट कागदपत्रांद्वारे गाडीसाठी कर्ज घेऊन बँकेची फसवणूक करणाऱ्या टोळीतील एकाला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्याने बनावट कागदपत्रांद्वारे १३ लाख ४३ हजार रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले होते; परंतु ही रक्कम खात्यातून काढण्यापूर्वी पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली.
अक्षय नितीन मोरे (२१) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा पुणे येथील बेनकर वस्तीचा राहणारा आहे. त्याने विनोद चव्हाण या बनावट नावाने कार घेण्यासाठी पनवेलमधील अ‍ॅक्सिस बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला होता. याकरिता त्याने विनोद चव्हाण नावाची बनावट कागदपत्रे तयार करून ती बँकेत सादर केली होती. यानुसार त्याला १३ लाख ४३ हजार रुपयांचे कर्जही मंजूर झाले होते. ही रक्कम लाटण्यासाठी त्याने नेरुळमधील अशोक सहकारी बँकेत कमल हुंदाई शोरूम नावाचे बनावट खाते उघडले होते. कर्जाची मंजूर झालेली रक्कम त्याने या खात्यात आरटीजीएस करून वळवली होती; परंतु यापूर्वीच त्याच्या कटाची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. यानुसार कक्ष दोनचे वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांनी सहायक निरीक्षक बबन जगताप, किरण भोसले, सुभाष पुजारी, हवालदार विजय आयरे, अनिल पाटील यांच्या पथकाद्वारे पाळत ठेवली होती. या वेळी कर्जाची रक्कम लाटण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याला पनवेलमधून अटक केली. या रॅकेटमध्ये त्याच्या इतरही सहकाऱ्यांच्या सहभागाची शक्यता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The lender is detained by fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.