फिल्मसिटी परिसरात मृतावस्थेत आढळले बिबट्या आणि सांबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 01:33 AM2019-01-02T01:33:27+5:302019-01-02T01:33:34+5:30

गोरेगाव येथील फिल्मसिटी परिसरात सोमवारी रात्री मृतावस्थेत बिबट्या आढळला, तसेच या बिबट्यापासून ५० मीटर अंतरावर एक सांबरही मृतावस्थेत आढळल्याने फिल्मसिटी परिसरात खळबळ उडाली आहे.

 Leopard and Sambar found in the dead body of the filmcity area | फिल्मसिटी परिसरात मृतावस्थेत आढळले बिबट्या आणि सांबर

फिल्मसिटी परिसरात मृतावस्थेत आढळले बिबट्या आणि सांबर

Next

मुंबई : गोरेगाव येथील फिल्मसिटी परिसरात सोमवारी रात्री मृतावस्थेत बिबट्या आढळला, तसेच या बिबट्यापासून ५० मीटर अंतरावर एक सांबरही मृतावस्थेत आढळल्याने फिल्मसिटी परिसरात खळबळ उडाली आहे. वन्यप्राण्यांना सापळा रचून मारण्याचा कट तर नाही ना? याचा शोध संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अधिकारी आणि ठाणे वनविभाग करत आहे.
फिल्मसिटी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र सुरक्षा रक्षक दलाचे रक्षक आणि चित्रनगरीची स्वत:ची सुरक्षा यंत्रणा आहे. परिसरात जागोजागी बॅरिगेट्स लावण्यात आले आहेत, तसेच प्रत्येक व्यक्तीची तपासणी करून प्रवेश दिला जातो.
मृतावस्थेतील बिबट्या सोमवारी एका व्यक्तीला आढळला. त्यानंतर, त्या व्यक्तीने फिल्मसिटीतील एमएसएफ विभागाला माहिती दिली. फिल्मसिटीने आरे पोलिसांना त्वरित कळविले. दरम्यान, दोघांनी मिळून वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवार रात्री घटनास्थळी धाव घेत बिबट्याचा मृतदेह ट्रॅपमधून काढला. मंगळवारी सकाळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकाºयांनी बिबट्याची ट्रॅपमधून सुटका केली. त्यानंतर, वनविभागाने पंचनामा करून परिसरात शोधकार्य सुरू केले.
ठाणे वनविभागाचे उपवन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले की, बिबट्याचा मृत्यू १५ ते २० दिवसांपूर्वी झाला असावा. परिसरात कुणीतरी वायर ट्रप लावला होता. या ट्रपमध्ये बिबट्या अडकल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. परिसरात तपास कार्य सुरू आहे. बिबट्याच्या पायाची अकरा नखे गायब आहेत. ही नखे गळून पडली असतील किंवा काढूनही नेण्यात आली असावीत. याचा गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू आहे. फिल्मसिटीमध्ये उरलेले अन्न बºयाचदा टाकले जाते. त्यामुळे कुत्रे आणि बिबटे येत असतात. वनविभागाकडून फिल्मसिटीतील लोकांना वारंवार सांगूनही त्यात काही सुधारणा झालेली नाही, असेही रामगावकर यांनी भाष्य केले.

वनविभागाच्या अधिकाºयांचे ‘सर्च आॅपरेशन’
फिल्मसिटीमध्ये एका मालिकेचा सेट उभारण्यात आला आहे. या सेटच्या शंभर मीटर अंतरावर मृत बिबट्या आढळला, तसेच ५० मीटरच्या अंतरावर मृतावस्थेत सांबर आढळला.
वनविभागाच्या ५० ते ६० अधिकारी आणि स्वयंसेवकांसोबत बुधवारी सर्च आॅपरेशन केले जाणार आहे.

मृतावस्थेतील बिबट्या ही तीन ते चार वर्षांची मादी होती. बिबट्याचे मृत शरीर हे गेल्या १५ ते २० दिवसांपासून तारेच्या विळख्यात अडकलेले होते. बिबट्याच्या कंबरेभोवती तार गुंडाळलेली आढळून आली. बिबट्याचे शरीर पूर्णपणे विघटित झाल्यामुळे शवविच्छेदन प्रक्रिया करण्यात आली नाही, तसेच काही अंतरावर मृतावस्थेत सांबरही मिळाला. गेल्या २० ते ३० दिवसांपासून सांबर तारेमध्ये फसला होता. सांबराच्या डाव्या पायात तार अडकली होती, तसेच सांबराचे डोके गायब होते.
- डॉ.शैलेश पेठे, पशुवैद्यकीय अधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

Web Title:  Leopard and Sambar found in the dead body of the filmcity area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई