मुंबई - मुलुंडमधील नानीपाडा परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सात जण जखमी झाले होते. भाजपा आमदार किरीट सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली होती. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. पोलीसही घटनास्थळी उपस्थित होते. अखेर सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळालं आहे.
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहे. वनविभागाचे अधिकारी बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार बिबट्या एका इमारतीत जाऊन लपला होता. बिबट्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली असल्या कारणाने अधिका-यांना अडथळा होत होता. बिबट्याला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. बिबट्याला पकडण्यात आलं असलं तरी स्थानिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे.
जखमींची नावे - बालाजी कामटे (४०), कृष्ण पिल्ले (४०), सविता कूटे (३०) गणेश पुजारी (४५) यांच्याशिवाय अन्य तिघे