४ वर्षांच्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला, रुग्णालयात तातडीने उपचार

By मनोहर कुंभेजकर | Published: October 4, 2022 03:04 PM2022-10-04T15:04:48+5:302022-10-04T15:05:15+5:30

स्थानिकांना सदर घटना कळताच या मुलाला महिला शिवसैनिक पूजा शिंदे व शाखाप्रमुख विलास तावडे यांनी मदत केली

Leopard attack on 4-year-old boy, urgent treatment in hospital | ४ वर्षांच्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला, रुग्णालयात तातडीने उपचार

४ वर्षांच्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला, रुग्णालयात तातडीने उपचार

Next

मुंबई - सुमारे एक ते दीड वर्षांनी आरे वनक्षेत्रात पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला सत्र सुरू केले आहे. गोरेगाव पूर्व,आरे कॉलनी, आदर्श नगर, गॅस टाकीजवळ  हिमांशू यादव या ४ वर्षाच्या मुलाच्या मणक्यावर बिबट्याने मागून हल्ला केला. आरेत बिबट्याचा हल्ले पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

स्थानिकांना सदर घटना कळताच या मुलाला महिला शिवसैनिक पूजा शिंदे व शाखाप्रमुख विलास तावडे यांनी मदत केली. त्यांनी सदर घटना स्थानिक आमदार रवींद्र वायकर यांना सांगितली. त्यांनी बाळासाहेब ठाकरे जोगेश्वरीच्या यांनी बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर हॉस्पिटलला फोन करून या मुलावर त्वरित उपचार सुरू करा, कोणतीही गैरसोय करू नका असे सांगितले. सध्या मुलाची तब्येत आता ठिक आहे.

या हॉस्पिटलला युवा सेना कार्यकरणी सदस्य अंकित प्रभू, शाखाप्रमुख अजित भोगले यांनी देखिल काल रात्री येथे भेट दिली आणि त्यांच्या कुटुंबांना धीर दिला. याप्रकरणी आरेतील सामाजिक कार्यकर्ते उदय सांगळे यांनी सांगिलले की, आता दीड वर्षाच्या नंतर आरेत बिबट्याचे हल्ले पुन्हा सुरू झाले आहेत.त्यामुळे वन खात्याने येथे पिंजरे लावून बिबट्याला लवकर जेरबंद करावे आणि येथे फ्लड लाइट्स लावावे, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: Leopard attack on 4-year-old boy, urgent treatment in hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.